मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
पूजा मी करु रे कैशी? येशी...

पूजा मी करु रे कैशी? - पूजा मी करु रे कैशी? येशी...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


पूजा मी करु रे कैशी?
येशी परि, पूजा मी करु रे कैशी? ॥

पडके हे घर माझे
कैसा बोलवू? हृषिकेशी! ॥ पूजा.... ॥

अश्रूंचा माझ्या हार
घालू का तो तव कंठासी? ॥ पूजा.... ॥

सुटतात जे सुसकारे
तेची संगीत, देवा! तुजसी ॥ पूजा.... ॥

जमले अपयश माझे
त्याच्या दाविन नैवेद्यासी ॥ पूजा.... ॥

द्याया तुजलागि योग्य
नाही काहिच माझ्यापाशी ॥ पूजा.... ॥

गोळा मी केल्या चिंध्या
कैशा दावू त्या मी तुजसी! ॥ पूजा.... ॥

मोती फेकुन देवा!
जमवित बसलो मी मातीसी ॥ पूजा.... ॥

त्वत्स्पर्श परि दिव्य होता
मृत्कण होतिल माणिकराशी ॥ पूजा.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP