मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
जन्ममरणांची। पाउले टाकीत ...

सोन्याचा दिवस - जन्ममरणांची। पाउले टाकीत ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


जन्ममरणांची। पाउले टाकीत
येतो मी धावत। भेटावया

पापांचे पर्वत। टाकूनिया दूर
येतो तुझे दार। गाठावया

दिवसेंदिवस। होउनी निर्मळ
चरणकमळ। पाहिन तूझे

पाहुन पायांस। निवतील डोळे
सुखाचे सोहळे। लाभतील

कधी तो सोन्याचा। येईल दिवस
पुरेल ही आस। अंतरीची

-नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP