मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
देवा! झुरतो तव हा दास करि...

देवा! झुरतो तव हा दास - देवा! झुरतो तव हा दास करि...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


देवा! झुरतो तव हा दास
करितो जरि सायास ॥ देवा.... ॥

वापीजवळी बाळ जाउन
आत पाहतो डोकावून
माता येई हळूच मागुन
प्रेमे उचली त्यास ॥ देवा.... ॥

मोहाजवळी देवा जाता
का न पकडशी माझ्या हाता
असुनी सकल जगाची माता
का मजशीच उदास ॥ देवा.... ॥

धी- बलवैभव माते नलगे
जनगौरव- यश माते नलगे
एक मागणे तुजला मागे
दे निर्मळ हृदयास ॥ देवा.... ॥

लहानसा दंवबिंदु साठवी
विमल निजांतरि तेजोमय रवि
तेवि तुला मी निर्मल हृदयी
ऐशी मजला आस ॥ देवा.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP