हे तात! दे हात करुणासमुद्रा - हे तात! दे हात करुणासमुद्...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
हे तात! दे हात करुणासमुद्रा॥
निज मग्न कर्मात
जग सर्व हे नित्य
पाहील कुणि ना मम म्लान मुद्रा॥ हे तात....॥
होई सुधासिंधु
होई दयाइंदु
होई मला गोड माहेर रुद्रा!॥ हे तात....॥
शिवो ना अमांगल्य
मजला शिवेशा!
अभद्र धरो जीव हा ना, सु-भद्रा!॥ हे तात....॥
प्रभु! जे खरे थोर
देती सदा धीर
सांभाळिती ते हता दीनक्षुद्रा॥ हे तात....॥
-पुणे, सप्टेंबर १९३४
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP