मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
हृदयंगम वाजत वेणू स्वैर न...

वेणु - हृदयंगम वाजत वेणू स्वैर न...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


हृदयंगम वाजत वेणू
स्वैर न विचरति इंद्रियधेनू ॥ हृदयं.... ॥

जीवन-गोकुळि ये वनमाळी
अमित सुखाची सृष्टी भरली
शिरि धरिन तदीय पदांबुज-रेणू ॥ हृदयं.... ॥

प्रेमळ गोपी या मम वृत्ती
वेडावुन प्रभुरूपी जाती
प्रभुविण वदति की काहिच नेणू ॥ हृदयं.... ॥

-नाशिक तुरुंग (गोकुळाष्टमी), ऑगस्ट १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP