मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
प्रभुवर मजवर कृपा करावी म...

मजवर कृपा करावी - प्रभुवर मजवर कृपा करावी म...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने

प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी ॥ मजवर.... ॥

भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी  ॥ मजवर.... ॥

नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी ॥ मजवर.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP