मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
काय करावे? मी केवळ मरुनी ...

मी केवळ मरुनी जावे - काय करावे? मी केवळ मरुनी ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


काय करावे?
मी केवळ मरुनी जावे
सदैव चाले ओढाताण
हृदयावरती पडतो ताण
उरले अल्पही न मला त्राण
कुणा सांगावे ॥ मी.... ॥

क्षणभर निर्मळ गगनी उडतो
दुस-याच क्षणी दरीत पडतो
खालीवर करुनी मी रडतो
कितिक रडावे? ॥ मी.... ॥

सदभाव मनी क्षण डोकावति
धरू जावे तो अदृश्य होती
केवळ हाती येते माती ॥ मी.... ॥
मृण्मय व्हावे

कोणावरती विश्वासावे
कोणाला मी शरण रिघावे
कोणा हाती जीवन द्यावे
कुणाला ध्यावे ॥ मी.... ॥

देवाचा न मज आधार
देवाचा न मज आधार
कोण पुशिल मल्लोचन-धार
तिने वाळावे ॥ मी.... ॥

मम जीवनि मज न दिसे राम
जगुनि न आता काही काम
अविलंबे मी मदीय नाम
पुसुन टाकावे ॥ मी.... ॥

-धुळे तुरुंग, जून १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP