मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
प्रभो! काय सांगू तुला मी ...

प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी - प्रभो! काय सांगू तुला मी ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी ॥धृ ॥

तुझी गोड येता स्मृती, आसवानी
पहा नेत्र येतात दोन्ही भरोनी ॥ प्रभो.... ॥

कृपेची तुझ्या कल्पना चित्ति येताच
पाषाण जातील रे पाझरोनी ॥ प्रभो.... ॥

अनंता! तुझ्या वैभवाला विलोकून
जाई अहंभाव सारा गळोनी ॥ प्रभो.... ॥

उदारा! दयाळा! तुझ्या देणग्यांचा
सदा दिव्य वर्षाव होई वरुनी ॥ प्रभो.... ॥

कृपेचा तुझ्या गोड मेवा मिळाया
सुखे जन्म घेईन मी फिरफिरोनी ॥ प्रभो.... ॥

जसे नीर मीनास तेवी तुझी रे
स्मृति जीवनाधार राहो बनोनी ॥ प्रभो.... ॥

जसा श्वास प्राणास तेवी तुझी रे
स्मृति जीवनाधार राहो बनोनी ॥ प्रभो.... ॥

तुझे प्रेम राया! तुझी भक्ति राया!
सदा रोमारोमांत राहो भरोनी ॥ प्रभो.... ॥

तुझे गीत ओठी तुझे प्रेम पोटी
तुला एक जोडीन जगि या जगोनी ॥ प्रभो.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP