मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
एक किरण मज देई केवळ एक कि...

एक किरण - एक किरण मज देई केवळ एक कि...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने

एक किरण मज देई
केवळ एक किरण मज देई ॥

कोटी रवि-शशि
तू पेटविशी
विश्वमंदिरी पाही
परि मम हृदयी
तिमिर सदाही
श्रमुनी जीव मम जाई ॥ एक.... ॥

किती कृमि-कीटक
रोगोत्पादक
बुजबुजाटा जणू होई
दे सौभाग्या
दे आरोग्या
तम मम विलया नेई ॥ एक.... ॥

मी धडपडतो
मी ओरडतो
कोणि न धावो भाई
आस तुझी मम
हरि झडकारि तम
मुळी न सुचे मज काही ॥ एक.... ॥

एक किरण ना
मागे फार
एक किरण शुभ
देऊन तार
प्रणति तुझ्या शुभ पायी
तेज:सिंधो!
प्रकाशबिंदु
दे, होईन उतराई ॥ एक.... ॥

-पुणे, सप्टेंबर १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP