मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
जागृत हो माझ्या रामा! हे ...

जागृत हो माझ्या रामा! - जागृत हो माझ्या रामा! हे ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


जागृत हो माझ्या रामा!
हे हृदयस्था! सुखधामा! ॥ जागृत.... ॥

तू भक्तजना आधार
तू ब्रह्मांडा आधार
हरि सकल मोहअंधार
जलदश्यामा! ॥ जागृत.... ॥

करि मन्मति निर्मळ पूत
भरि भक्ती ओतप्रोत
त्वद्ध्यान लागु दिनरात्र
सद्विश्रामा! ॥ जागृत.... ॥

लाविले तुजकडे डोळे
शतवार जाहले ओले
हे हृदय किती गहिवरले
घेता नामा ॥ जागृत.... ॥

मज नको मान धन कीर्ती
मज लौकिकाचि ना प्रीती
निज दाखव मंगल मूर्ती
पुरवी कामा ॥ जागृत.... ॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP