मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
हृदयाकाशी मेघराशी आल्या क...

हृदयाकाशी मेघराशी - हृदयाकाशी मेघराशी आल्या क...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


हृदयाकाशी मेघराशी
आल्या का जमून
हृदयाकाश त्यांच्या भारे
सारे गेले नमून ॥

येणार आहे स्वामि माझा
येणार आहे राजा माझा
त्याच्यासाठी म्हणून
मनोमंदिर धुवून टाकिन
निर्मळ ठेविन करून ॥ हृदया.... ॥

कामक्रोधांच्या वटवाघळांनी
नाना वासनांच्या उंदिरघुशींनी
घाण ठेवली करून
धुवायाला मेघधारा
आल्या भरभरून ॥ हृदया.... ॥

अंतर्बाह्य होवो वृष्टी
भरो हृदय भरो दृष्टी
मळ जावो झडून
काने कोपरे शुद्ध होवो
मळ न राहो दडून ॥ हृदया.... ॥

हृदय निर्मळ शरीर निर्मळ
बुद्धि निर्मळ दृष्टी निर्मळ
जीवन निर्मळ बघून
प्रसन्न होइल प्राणसखा
हृदयिं ठेविल धरून ॥ हृदया.... ॥

-धुळे तुरुंग, जून १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP