काही कळेना, काही वळेना - काही कळेना, काही वळेना।। ...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
काही कळेना, काही वळेना॥
निरभ्रशा अकाशात
कुठूनशी अभ्रे येत
झणी सूर्य झाकोळीत
तेज ते पडेना॥ काही....॥
जरा वरी येई मोड
कुठूनशी तो ये कीड
खाइ अंकुराला गोड
वाढ ती घडेना॥ काही....॥
पतंग जो वरती जाई
तोच उलट वारा येई
क्षणामध्ये गोता खाई
तो वरी चढेना॥ काही....॥
मला गमे तोची आला
उठे मिठी मारायला
परी भास सारा ठरला
तो कधी मिळेना॥ काही....॥
अशी निराशा ही फार
जीव होइ हा बेजार
लोचनीचि अश्रूधार
ही कधी सुकेना॥ काही....॥
-धुळे तुरुंग, एप्रिल १९३४
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP