मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
तळमळतो रे तुझा तान्हा।। क...

तळमळतो रे तुझा तान्हा - तळमळतो रे तुझा तान्हा।। क...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


तळमळतो रे तुझा तान्हा॥
कामधेनु तू माझी देवा
चोरु नको रे अता पान्हा। तळमळतो....॥

धन कृपणाला जल मीनाला
तेवि मला तू सख्या कान्ह्या। तळमळतो....॥

गोकुळि गोरस सकळां दिधला
प्रभुजि अजी ते मनी आणा। तळमळतो....॥

अजुन दया जरि तू ना करिशिल
ठेवु कशाला तरि प्राणा। तळमळतो....॥

-नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP