मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
येइ ग आई मज माहेराला नेई ...

मज माहेराला नेई - येइ ग आई मज माहेराला नेई ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


येइ ग आई
मज माहेराला नेई ॥

तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव
सुकुनी जाई ॥ मज.... ॥

वृक्ष जसा तो मूळावीण
फूल जसे ते वृंतावीण
मीन जसा तो नीरावीण
तसे मज होई ॥ मज.... ॥

सदैव येते तव आठवण
भरुन येती दोन्ही नयन
तगमग करिते अंत:करण
सुचेना काही ॥ मज.... ॥

शतजन्मांचा मी उपवासी
एक कणहि ना माझ्यापाशी
तू तर औदार्याची राशी
कृपेने पाही ॥ मज.... ॥

तुझ्याजवळ मी सदा बसावे
त्वन्मुखकमला सदा बघावे
भक्तिप्रेमे उचंबळावे
हेतु हा राही ॥ मज.... ॥

वात्सल्याने मज कवटाळ
तप्त असे मम चुंबी भाळ
प्रेमसुधा सुकल्या मुखि घाल
जवळी घेई ॥ मज.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP