मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी| दु:खाला जे विसरवनिया दिव्... साने गुरूजी अनंत आई झगडे मनात उसंत ना... हृदय मदीय तव सिंहासन होवो... प्रभुवर मजवर कृपा करावी म... एक किरण मज देई केवळ एक कि... माझी बुडत आज होडी मज कर ध... अति आनंद हृदयी भरला प्रिय... मम जीवन हरिमय होऊ दे हरिम... मजला तुझ्यावीण जगी नाही क... तव अल्प हातून होई न सेवा ... सदयहृदय तू प्रभु मम माता ... दिसतात सुखी तात! सारेच लो... देवा! धाव धाव धाव या कठिण... दु:ख मला जे मला ठावे मदश्... नयनी मुळी नीरच नाही करपून... मी प्रभुराया! त्वदंगणांती... प्रभु! जन्म सफल हा व्हावा... येइ ग आई मज माहेराला नेई ... येतो का तो दुरून बघा तरि,... पूजा मी करु रे कैशी? येशी... पूजा करिते तव हे, प्रभुवर... आम्ही देवाचे मजूर आम्ही द... जरि वाटे भेटावे प्रभुला ड... मन माझे सुंदर होवो वरी जा... काय करावे? मी केवळ मरुनी ... असो तुला देवा! माझा सदा न... प्रभो! काय सांगू तुला मी ... हृदयंगम वाजत वेणू स्वैर न... मनमोहना! भवमोचना! भूक लाग... बाल्यापासुन हृदयात बसुन ग... हृदयाकाशी मेघराशी आल्या क... देवा! झुरतो तव हा दास करि... प्रभु! सतत मदंतर हासू दे ... जागृत हो माझ्या रामा! हे ... हे नाथ! येईन तव नित्य काम... हे तात! दे हात करुणासमुद्... तुजवीण अधार मज कोणि नाही काही कळेना, काही वळेना।। ... आई! आई! तू मज मार मार।। ... दिव्य आनंद मन्मना एक गोवि... पडला हा अंधार कैसे लावियल... वारा वदे कानामधे गीत गाइन... होतो मी कासावीस। झुरतो मी... काय सांगू देवा, कोणा सांग... असो तुला देवा माझा सदा नम... गाडी धीरे धीरे हाक। बाबा ... पतीत खिन्न अति दु:खी उदास... ध्येयहीन कर्महीन शक्तिहिन... फुलापरी दंवापरी हळु मदीय ... हे शरणामतजन-करुण! दाखव मज... नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... करीन सेवा तव मोलवान। असो ... खरोखरी मी न असे कुणी रे। ... रडण्याचे ध्येय भरला हा अंधार। सारा भरला ... सरला घन अंधार। आला प्रकाश... हे सुंदरा अनंता! लावण्यके... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... मला हसता का? हसा हसा सारे... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... किती धडपडलो किती भागलो मी... तुझ्याविणे कोणि न माते वत... तृणास देखून हसे कुरंग। मर... कळ्या जळीवीण कशा फुलाव्या... जीवनाच्या ओसाड वाळवंटी। क... संपोनीया निशा। उजळते प्रभ... जन्ममरणांची। पाउले टाकीत ... उदास झालो त्या दिवशी। निर... माझ्या ओठावरि थरथरे प्रार... पुशी अहंता निज पापमूळ। खर... प्रकाश केव्हा भवनी भरेल? मला तुझ्यावीण कुणी कुणी न... जीवनसुमना मदीय देवा! त्वच... सदा राम गुंफिन कारुण्यवसंता रामा। तुजसाठ... अहा चित्त जाई सदा हे जळून... प्रभु माझी जीवनबाग सजव।। ... अनुताप- आसवांनी। कासार मा... तळमळतो रे तुझा तान्हा।। क... नाशी मोह प्रभुजि अथवा प्र... कधि येशिल हृदयि रघुराया क... मम हातांनी काहि न होइल का... नको माझे अश्रु हाचि थोर ठ... ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘... प्रभु मम हृदयि आज येणार! ... फुलापरी या जगात सुंदर एक ... मम दृष्टीला भेसुर दिसते भ... खरा तो एकची धर्म। जगाला प... असे का जीवनी अर्थ? असे रे... आयुष्याच्या पथावर। सुखा न... विशुद्ध मत्स्वांत सदैव रा... भरो विश्वात आनंद। शांती न... काय करावे मी मेघासम विचरा... मी वंदितो पदरजे विनये तया... विशुद्ध भाव अंतरी कृती उद... उत्साहसिंधु थोर। चित्तात ... करुन माता अनुराग राग। विक... कर्तव्याला करित असता दु:ख... हिंदू आणिक मुसलमान ते भां... तीन वर्षांचा बाळ गोड आला।... दु:खाला जे विसरवनिया दिव्... नूतन संवत्सर आला। मोद मना... मकर-संक्रांत सुखाच्या सुक... होतो मी लहान आनंदाने मनी ... असे माझा मित्र हो लहान। त... काय मी रे करू देवा आळविले... अद्याप पातकाने। नाहीच स्प... शस्त्रास्त्रांनी सुटती न ... रवि मावळला, निशा पातली, श... “चिरमित्र सखा सहोदर मम तू... बा नीज, सख्या! नीज गड्या ... आत्मा ओत रे ओत निर्मावा द... निरोप धाडू काय तुला मी बा... हे भारतमाते मधुरे! गाइन स... मनमोहन मूर्ति तुझी माते स... एक मात्र चिंतन आता एकची व... प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... स्वातंत्र्याचे अम्ही शिपा... अम्ही मांडू निर्भय ठाण। द... धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती... प्रिय भारतभू-सेवा सतत करु... झापू नको झणि ऊठ रे पाहे स... बलसागर भारत होवो विश्वात ... भूषण जगताला होइल, भूषण जग... भारतजननी सुखखनि साजो तद्व... हृदय जणु तुम्हां ते नसे।।... माझ्या महाराष्ट्रभूमीत मो... भारतमाता माझी लावण्याची ख... मरणही ये तरी वरिन मोदे जन... ध्येय देईन दिव्य मी स्वर्... देश आमुचा वैभवशाली वाली स... उत्साही मुखमंडले भुजगसे द... नाही आता क्षणहि जगणे भारत... प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ... दुबळी मम भारतमाता दीन विक... सन्मित्रांनो! सुबांधवांनो... हे शुभकीर्ते जगद्विश्रुते... हे जीवन केविलवाणे। गाऊ मी... प्राण अर्पावे। स्वातंत्र्... आनंदाचा। उगवला दिवस सोन्य... मंगल मंगल त्रिवार मंगल पा... मनोहरा भारता! मदंतर देवा!... ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वल... वंदे मातरम् वंदे मातरम् व... भारतजननी तव शरणम्। भारतमा... अन्यां करील जगती निज जो ग... सत्याचा जगतात खून करिती, ... उज्वला! निर्मला हे भारतवर... करुणाघन अघशमन मंगला जनार्... राष्ट्रीय जीवन ओसाड मैदान... करु वंदना प्रभाती। करु की... ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... हसो दिवस वा असो निशा ती। ... शाळा सुटली कटकट मिटली बाळ... मातृभूमि! माझ्या चित्ता ए... अजि घुमघुमली स्वतंत्रतेची... भारतात या नसे मुलांचा तोट... महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श... स्वातंत्र्यसूर्य राणा। चि... विश्वाला दिधला तुम्हीच भग... मी मांडितसे विचार साधे सर... सत्याग्रही या नावाचे एक ख... ग्रंथमहिमा - दु:खाला जे विसरवनिया दिव्... साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने Tags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी ग्रंथमहिमा Translation - भाषांतर दु:खाला जे विसरवनिया दिव्य आनंद देतीएकांती जे परम निकट स्नेहि सप्रेम होतीचित्ती ज्यांच्या मुळि न शिवतो भेद हा साव चोरसर्वांनाही सुखवित सदा ग्रंथ हे संत थोर॥कोणी येवो पुरुष वनिता बालिका बाल वृद्धसर्वा देती सुरस, करिती बुद्धिते जे समृद्धगांभीर्याते किति तरि पहा जीवनी आणितातआपन्मग्ना हत-जन-मना ग्रंथ हे तातमात॥तुम्हां द्याया सतत असती ग्रंथराजे तयारपावित्र्याची परम विमला ज्ञानपीयूष-धारजी संसारी तृषित हृदये ग्रंथ हे ज्ञानसिंधुत्यांना होती मधुर, निवती सेविता एक बिंदु॥झाले गेले कितिक परि ते ग्रंथ आहेत नित्यआनंदाला वितरुन जगा दाविताती सुपंथसेवा धामी विपिनि करिता ग्रंथ तैशीच कारीनाही सा-या भुवनि असले मित्र नित्योपकारी॥रात्री प्रात:समयि उघडा ग्रंथ केव्हाहि वाचायुष्मत्सेवा विपुल करणे हाच आनंद त्यांचाहिंडायाची अविचलमने काळसिंधूवरूनज्याला इच्छा, फिरविति तया ग्रंथ हातात धरून॥नानालापे रमविति मना ग्रंथ ही गोड वेणूजे जे वांछी मन वितरिती ग्रंथ ही कामधेनूमातीलाही कनक करिती लाजवीती परीसनाही मोठा हितकर सखा अन्य ग्रंथापरीस॥आयुष्याची हितकर दिशा ग्रंथ हे दाखवीतीजीवित्वाची शिकविति कला नूतना दृष्टि देतीउन्मत्तांना नमविति विपदग्रस्त त्या हासवीतीप्रज्ञावंत स्थिर करुनिया मूर्ख त्या लाजवीती॥संबोधूनी करिति जगदुत्कर्ष हे ग्रंथ साधेग्रंथलोके मनुजमतिला कार्यकौशल्य लाधेनि:स्वार्थी हे अखिल-भुवनाचार्य सदग्रंथ दिव्यमानव्याला उचलिति वरी पंथ दावीत भव्य॥माता भ्राता प्रियसख गुरु तात वा रम्य कांतानानारुपे रमविति पहा ग्रंथ हे मानवाताजे ना कोणाप्रतिहि कथिले ग्रंथकारे विचारते या ग्रंथी प्रकट, उघडे अंतरातील सार॥सांगे ना जी प्रियतमजनापाशिही ग्रंथकारओती ती हो खळबळ इथे, विवृत स्वांतदरपापुद्रे ते सकळ दिसती चित्तकंदावरीलयेई सारे हृदय कळुनी गूढ गंभीर खोल॥ग्रंथाकारे विमल अमरा दिव्यरंगा समाधीलावण्याची परम मधुरा लेखक स्वीय बांधीकैसे तेथे झळकति हि-यांसारखे सद्विचारजैसे नानाविध मणि तसे भावनांचे प्रकार॥ग्रंथामाजी अमर असती दिव्य चैतन्यरुपकर्ते, विश्वा सुखविति सदा मोद देती अमूपकेव्हाही ना मृति शिवतसे थोर सदग्रंथकारालोकोद्धारा निशिदीन उभा द्यावया ज्ञानधारा॥त्रैलेक्यी या फिरविति तुम्हां ग्रंथ देऊन पंखतत्त्वज्ञानी कवि मुनि तसे भेटती राव रंकअंतर्यामी उसळविति ते गोड आनंदपूरकेव्हा केव्हा रडविति किती गाउनी दु:खसूर॥==संसाराचे त्रिविध मनुजा दाविती ग्रंथरुपनाना रुपे मनुजहृदया ज्ञान देती अमूपछेडोनीया तरल हृदयी सूक्ष्म तारा अनंतजीवात्म्याला परिसविति ते दिव्य संगीत ग्रंथ॥जे जे काही घडत असते मानवी जीवनातअंतर्बाह्य प्रकट करिती ग्रंथ सामर्थ्यवंतअंत:सृष्टी गुरु किती तरी बाह्यसृष्टीपरीसते सदग्रंथांवरुन कळते होइ अंतर्विकास॥केव्हाही दुर्मुख न दिसती ग्रंथ नित्य प्रसन्नना कोणाला कथितिल कधी गोष्टी त्या भिन्न भिन्नग्रंथांऐसे परमसुख ना देखिले या जगातग्रंथी होता निरत मज तो होउ दे मृत्यु प्राप्त॥आदर्शाला, शुभ अशुभ वा स्वीय रुपा बघायादेती ग्रंथ स्वकरि मनुजा, या मिषे उद्धाराया‘सत्याचा तो विजय ठरला, सत्य पूजा सदैव’सदग्रंथी हे सतत असते सूत्र हो एकमेव॥माते ना ते विभव रुचते राजवाडे नको तेनाते गोते मजसि नलगे नाम मोठे नको तेवस्त्रांची ती तलम न रुची ना अलंकार कामव्हावे माझ्या निकट परि हे ग्रंथ कैवल्यधाम॥रात्री माझ्या निकट असु दे तैलसंपूर्ण दीपइच्छा नाही इतर असु दे ग्रंथराजे समीपकोठे रानी मग सदनि वा अन्य देशी तुरुंगीआनंदाने परिहरिन मी काळ सदग्रंथ-संगी॥-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१ N/A References : N/A Last Updated : April 20, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP