मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रेय

अर्थालंकार - प्रेय

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
भाव जरी दुसर्‍याला पोसाया अंगभूत हो तरि ती ॥
प्रेयालंकृति ऐसें ज्ञाते जे ते सदैव वदताती ॥१॥

गद्य-
यांत भाव ह्मणजे देवता, गुरु, शिष्य, द्विज, पुत्र इत्यादि विषयीं जी रती ती.

श्लोक-
कधीं काशीमध्यें अमरनदितीरीं बसुनिया ॥
कसोनी लंगोटी निजकर शिरीं मी धरुनिया ॥
अरे गोरी कांता त्रिपुरमथना हे पशुपते ॥
प्रसीदेत्याक्रोशें निमिषसम नेईन दिन ते ॥२॥

येथें शांतिरसाच्या अंगभूत चिंताख्य व्यभिचारी भाव आहे; आणि तो " कधीं " या पदानें सुचविला आहे.

श्लोक-
अद्री उंच चहूंकडेस दिसती अब्धीहि मोठे तसे ॥
वाहोनी दमलीस ह्यांस न तुला माझी न ती ही असे ॥
ऐसें मी स्तविता कर स्मृति मला विश्वंभरा जाहली ॥
ज्यानें ही धरिली असे मग पुढें वाणी अरे खुंटली ॥३॥

येथें प्रभुविषयक जो रतिभाव त्याचा वसुमती विषयक रतिभाव हा अंगभूत आहे.

श्लोक-
कधीं कांतागारीं शिरुन कुसुमाकीर्ण-शयनीं ॥
निजोनी कांतेचे कुचयुग उराशीं च धरुनी ॥
अगे कांते ! मुग्धे ! कुटिलनयने ? हें प्रणयिनी ॥
प्रसीदेत्याक्रोशें निमिषसम नेईन रजनी ॥४॥

येथें ऋंगाररसाचे अंगभूत चिंताख्य व्यभिचारीभाव आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP