अर्थालंकार - संकर
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
नीर - क्षीर - परी जरि अलंकृतीचा मिलाफ होत असे ॥
संकर तरी अलंकृति यामध्यें स्पष्ट भेद दिसत नसे ॥१॥
श्लोक-
राखो अम्हांते रविवाजि-राजी ।
पयोधरौन्नत्यचि लंघिते जी ॥
तेजाळमध्यारुण नायकें जे ॥
नभश्रिला पांच पती च साजे ॥३॥येथें पयोधरादि शब्द श्लेष्ममूल अतिशयोक्ति अंगभूत असून, सूर्या:-अश्वाचे पंक्तीचे ठिकाणीं पाचूचे हाराची तादात्म्योत्प्रेक्षा करुन नभ श्रीचे ठिकाणीं नायिका व्यवहार समारोषरुप समासोक्ति गर्भित केली आहे. येथें उत्प्रेक्षा समासोक्ति याचा परस्परपेक्षेनें चारुत्वाचा उदय सारखाच आहे. म्हणून समप्राधान्य संकर झाला. याप्रमाणेच:-
श्लोक-
अंगुली सम शशी किरणीं हा ॥
खेचितो कच तमास अहाहा ! ॥
नेत्ररुप मिटुनी कमलाला ॥
चुंबितो जणु निशावदनाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP