अर्थालंकार - अनन्वय
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप् - उपमानोपमेयत्व । एका वस्तूवरी असें ॥
अनन्वय तदा चंद्र । कांतीनें चंद्रतुल्यचि ॥१॥
आर्या - गगनाकार गगन हें सागर हा भासतोच सागरसा ॥
रण रामरावणाचा झाला श्री रामरावणाचासा ॥२॥
गद्य - जेव्हां उपमानत्व व उपमेयत्व हीं दोन्हीं एकाच वस्तूवर असतात ह्नणजे जें उपमेय असतें तेंच उपमान असतें, तेव्हां हा अलंकार होतो. जसें कांतीचे संबंधानें पाहूं गेलें असतां चंद्रास चंद्राचीच उपमा शोभते, दुसरी कोणाचीही उपमा शोभत नाहीं. येथें चंद्र हें उपमान व चंद्र हेंच उपमेय. याप्रमाणेंच दुसरे आर्येत गगनास उपमा गगनाचीच दिली आहे. सागराला सागराची, व रामरावणयुद्धाला, रामरावणयुद्धाचीच.
आर्या-श्रीराम-रावण-समर होय श्रीराम-रावण-समरसा ॥
ते वृष्टि जसे न करिति तशि शुचि सशकार-रावणसम रसा ॥३॥
मंत्ररामायण.
होय राम-राज्य-राज्यसेंचि तोखद ।
व्याधि जो भवाख्य उग्र हें तयास ओखद ॥
कीं करी प्रकाशुनि स्वसन्महानि रंजन ॥
श्रीश-बुद्धिचें हरुनि जन्महा निरंजन ॥४॥
पंचचामररामायण.
गद्य-राम रावण यांनीं एकमेकांवर जो शराचा पाऊस पाडला, तसा आषाढ व श्रावण महिन्यांत पाऊस पडत नाहीं, असा या
आर्या (३) चा सारांश आहे. प्रथमार्धांत अलंकार दाखविला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP