अर्थालंकार - प्रत्यनीक
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
बलवद्रिपुपक्षीं करि पराक्रमा प्रत्यनीक त्या ह्णणती ॥
जयशाली -नेत्रानुग-कर्णावरि बैसतात कमलें तीं ॥१॥
येथें कमलास जिंकणारे जे नेत्र त्यांचे अनुग जे कर्ण ते कमलाचे शत्रूपक्षांतलें झाले. असें जाणून कमलांनीं कर्णावर आरोहण केलें. येथें बलवान् शत्रुपक्षीं पराक्रम घडला आहे.
मम रुपकीर्ति हरली ज्यानें त्यावरिच सक्त हृदयेला ॥
जाणुन मात्सर्ये कीं क्षीण करी मदन सोडुन दयेला ॥२॥
श्लोक-
निज-मधु-निधिरुपी-अब्ज-सम्मीलनानें ।
मधु कर-गण-भारी क्रुद्ध होतां तयानें ॥
तुहिनकिरण - बिंबा ओढुनीया बलानें ।
ध्रुव शशि-तनु केली युक्त ती लांछनानें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP