मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विनोक्ति

अर्थालंकार - विनोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
किंचिद्विना प्रस्तुत हीन जेथें ।
विनोक्त्यलंकार चि जाण तेथें ॥
मनोहरा यद्यपि होय विद्या ।
ती नम्रतेवाचुनि जाण निंद्या ॥१॥

येथें विद्येचें वर्णन प्रस्तुत म्हणजे वर्ण्य आहे आणि तो नम्रतेवाचूंन
निंद्य आहे, असें दर्शविलें आहे.

जो देखिना राम कदांहि काळीं । ज्या राम देखे नच हो त्रिकाळीं ॥
निंदेस तो पात्र मनुष्यलोकीं । स्वात्महि त्या निंदेतसे अहो कीं ॥२॥
किंचिद्विना प्रस्तुत रम्यमाण । विनोक्त्यलंकारहि तेथ जाण ॥
नरेंद्रवर्या परिषत्तुझी ही । खलाविना शोभतसे सदाही ॥३॥
अंध:कारें त्यजिलि दिसते रात्रशी चंद्रतेजें ॥
ज्वाला जैशी बहुतचि निशीं धूर्मनाशें विराजे ॥
मोहानें ही वरतनु मला वाटते सोडिलीशी ॥
रोध:पातें गढूळ निवळे मागुती जान्हवीशी ॥४॥
हें कर्दमाविणहि शोभतसें तळें हो ॥
दुष्टाविना रुचिर भूपसभा तशी हो ॥
तैसेंच काव्य कटुशब्दविना सुरम्य ॥
हो चित्त तेंवि विषयाविण फार रम्य ॥५॥

गद्य-
हा अलंकार विना या शब्दावाचूनही होतो. श्लोक (२) व (४) यांत विना अथवा विनाया या अर्थाचा शब्द नाहीं. एकांत रामदर्शनाविण पुरुष निंदनीय आहे असें दाखविलें आहे. दुसर्‍यांत अंधाराविण जशी रात्र, धुरावाचून जशी अग्नीची ज्वाला, व किनार ढासळून गढूळ झालेली पुन: निबळणारी जशी गंगा तशी मोहावाचूनही सुंदरी फार शोभते, असें दर्शविलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP