अर्थालंकार - पिहित
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या -
परवृत्तांत समजुनी जी साभिप्राय कृति तया पिहित ॥
येतां पति प्रभातीं बसली शय्या तयार ती करित ॥१॥
श्लोक-
घर्माचे जे बिंदु आले मुखाला । त्यांनी कुंकू लागलेंसें गळ्याला ॥
देखे हांसे पुंस्त्व तैं दाखवीते । दासीहातीं खड्गरेखा लिहीते ॥२॥
गद्य-
येथें धर्माचे जे बिंदु आले होते त्यांनीं कुंकू गळ्याला लागलेलें पाहून सखीनें पुरुषाईतनामक रतिबंध केला, हें दाखविण्याकरितां
दासीनें सखीच्या हातावर तलवार काढली. येथें परवृत्तांत जाणून साभिप्राय कृति झाली आहे. सखीला समजावयाकरितां नव्हे. सूक्ष्मा-
लंकारांत विटाला संकेत कालाची माहिती व्हावी ह्नणून सखीनें साभिप्राय चेष्टा केली आहे.
वरील दोन्ही अलंकारास काव्यप्रकाशकारांनीं सूक्ष्म हेंच नांव दिलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP