मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
शब्दप्रमाण

अर्थालंकार - शब्दप्रमाण

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
दोषप्रकाश करितां कथिला शिवाचा ॥
जो दोष ती गमतसे मज साधु वाचा ॥
जो आदिकारण विदीसहि मानिताती ॥
तज्जन्म कोण अवलोकिल केवि रीती ? ॥१॥

येथें शिव हा ब्रह्मदेवाचें आदिकारण आहे असें श्रुतिप्रमाण आहे. "जो आदिकारण विधीसहि" हे शब्द प्रमाणभूत आहेत. याप्रमाणेंच
खालीं ही: -

आर्या-
पापें करा बळेंची होतोतचि अकृतापरि तुम्हाला ॥
"जीं जीं बळेचि केलीं पापें ती सर्व अकृत मनु वदला ॥

हें स्तुतिप्रमाण आहे.

श्लोक-
महाजनाचारचि हा असे सदां । स्वनाम घेती न भले अगे कदां ॥
कथावया मी न ह्मणून इच्छितों । अवद्य जो तो जनरीती मोडितो ॥३॥
हें आचारप्रमाण आहे.

श्लोक-
ती योग्यचि क्षत्रियदार व्हाया । इच्छा इयेची जरि हो मना या ॥
संदिग्धवस्तूविषयीं सतांची । प्रमाण हो वृत्तिच कीं मनाची ॥४॥

आर्या-
नामेंचि तूं वरदेर यासाठीं वरदचिन्ह धरिशि न तें ॥
वेदप्रसिद्ध अर्था लिंग बुधांनीं न पूजिलें जातें ॥५॥
माहित असे तुह्माला कीं माझ्या स्वार्थपर न या वृत्ती ॥
ऐसा मी आहें हें आठ तनू त्या जनास सुचवीती ॥६॥

श्लोक-
काय मानिशि बिभो मन हीचें । लीन होईल तुझ्यांतचि साचें ॥
मेलिया नलमुखेंदुच यातें । प्राप्त होय वदला स्मर मातें ॥७॥
श्रीपावकापासुनियावरावी । सत्योक्ति ही हें रघुराज दावी ॥
हुताशनापासुनिया तुला तो । विदेहजे यास्तव काय घेतो ॥८॥
काळाचें बळ थोर ईश ह्मणती तें सत्य हो अत्यया ॥
याच्या कोण करील शक्ति अतुला आलीच मत्प्रत्यया ॥
कीं हें ऐकुनि बालभाषण वश ज्ञातेहि झाले पहा ॥
कीर्तीच्या वदनासि लाविति मषी वाटूनिया लेप हा ॥९॥
बृहद्दशम.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP