मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
उदात्त

अर्थालंकार - उदात्त

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
समृद्धिकथा जेथें स्तुत्य चरित्रें दुजास कळवीती ॥
तेथें उदात्त, शंकर-पार्थ-समर होय याच गिरिवरती ॥१॥
रत्नस्तंभीं पडलीं प्रतिबिंबें शेंकडों तिहीं दिसला ॥
आवृत कशकंधर तो पवनसुतें संकटेंअ जाणितला ॥२॥

श्लोक-
अंबे स्तोकलोक-सुधा -शीकर-योगें ॥
ज्या प्राण्याची आर्द्र करीशीलचि अंगें ॥
त्याचे हस्तातून गजापासून वाहे ॥
दानांबुतें अंगण जंबाल करी हें ॥३॥

आर्या-
श्रीपतिच्या महिषीची कल्याणास्तव उपासना करितों ॥
जीचेसाठी श्रीहरि समुद्रमथनादि यत्न बहु करि तो ॥४॥

श्लोक-
जगद्गुरु-महेश्वर -प्रभु शिरीं जिचें नांदणें ॥
जिच्या जळ-मळें तुळे न शरदिंदुचें चांदणें ॥
प्रजा हरिहरा अशा यदुदरीं अनेका कवी ॥
भिऊनि ह्मणतील कीं जशि सुधा तशी काकवी ॥५॥
केकावली.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP