मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अनुगुण

अर्थालंकार - अनुगुण

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
पूर्वीपासुन जे गुण सिद्ध तदुत्कर्ष अन्ययोगें हो ॥
अनुगुण तो इंदीवर अतिनीलत्वा धरी कटाक्षें हो ॥१॥
कपि जरिहि कापिशायन मद्या पी त्यांत दंश विंचूचा ॥
हो त्यांत भूतबाधा चाळे त्याचे किती कथिल वाचा ॥२॥

श्लोक-
क्षीराब्धी जरि बाप सोदर तुझे हे कौस्तुभादी जरी ॥
भर्ता अच्युत दिव्यमंगलतनु श्रीवत्सधारी हरी ॥
श्री हें नामचि वास पद्मभुवनीं तो पक्षिराड्‍ वाहतो ॥
सौभाग्यास कथी असा कवण गे सांगे असे मर्त्यं तो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP