मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अर्थांतरन्यास

अर्थालंकार - अर्थांतरन्यास

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
विशेषसामान्यमिलाफ जेथें । अर्थांतरन्यासाह जाण तेथें ॥
तरे महासागर आंजनेय । मोटयास हो दुष्करणीय काय ॥१॥

सामान्योक्ति व विशेषोक्ति हीं दोन्हीं जेव्हां एका ठिकाणीं येतात तेव्हां हा अलंकार होतो. जसे:-
"आंजनेय (मारुती) महासागर तरला" हें एका विशेष व्यक्तीविषयीं झालें परंतु " मोठयाला करण्यास कठिण तें कोणतें" हा सामान्य
सिद्धांत आहे. याप्रमाणेच: -

आर्या-
गुणवत्संबंधानें नीचहि पावे सदा महत्वास ॥
माळेच्या संबंधें-सूत्रालाही घडे शिरीं वास ॥२॥
विश्वासघात दुर्जन-वधहेतुचि वीर-कोप कर ह्णणुन ॥
नव-तरु-भंग-ध्वनि जशि हरि हरि निद्रा गजास दे निधन ॥३॥
श्लोक-आलिंगिताच शरदें मृगलांच्छनाला ।
विद्युत्कटाक्षसह पाउसकाळ गेला ॥
सौभाग्यरुप गुण कोण नितंबिनीचा ।
होई न नष्ट परिभ्रष्ट पयोधरांचा ॥४॥
रक्षीर वीपासुन जो तमाला । जसा गुहांमाजी उलूकमाला ॥
मोठयाकडे जो शरणार्थि आला । विसंबती ते न कधीं तयाला ॥५॥
आर्या-निर्बलहि एकवटतां साधे दुष्करहि कार्य भाग जरी ॥
दोरी करुन तृणाची त्यायोगें बांधितात मत्त करी ॥६॥

श्लोक-
जे बोलती पार्वती ! पापवृत्तितें ।
सौंदर्य उत्पन्न करी न सत्य तें ॥
हें सुंदरी शील तुझें विलोकुनी ।
घेतात त्याचा उपदेश कीं मुनी ॥७॥
आर्या-सदिषुधिशतसंबाधी नमुनि उलूपीश शुभ रथीं चढला ॥
कढला क्रोधें समयीं धर्मातें कां चुकेल जो पढला ॥८॥
मोरोपंत भारत.

श्लोक-
हस्तीतें धुतलें जळीं बुडविलें मालिन्यही नासिलें ।
तेणें तें अपुलें स्वकर्म वहिलें तीरींच आरंभिलें ॥
शुंडाग्रें धरिलें धुळीस भरलें सर्वांगही आपुलें ।
प्रायश्चित्त दिलें तथापि न भलें ज्याचें अमन क्षोभलें ॥९॥
वामन.
सेवी नित्य गुरु-जनांस सवती तू मैत्रिणीशा करी ।
वागे कांत विरुद्ध तूं नच कधीं धि:कार केला जरी ॥
होई फारचि सेवकीं सरल तूं भाग्यें अनुच्छेकिणी ।
वत्से यापरि वागतात गृहिणी अन्या कुला जाचणी ॥१०॥
आर्या-उन्मार्गगा तया ती धि:कारी श्री ह्णणे वराका मी ॥
मानधन-सुता भार्या बुडवि धन-कुळा कलेवरा कामी ॥११॥
उमारामायण.

गद्य-
अर्थांतरन्यासांतही काव्यलिंगाप्रमाणेच अर्थांची पुष्टीकरणापेक्षा असून त्याप्रमाणेंच पुष्टीकरण केलें जातें. परंतु अर्थांतरन्यासांत
असें पुष्टीकरण असून दोन वाक्यांत एक सामान्य व एक विशेष असा संबंध असतो. काव्यलिंगांत अशा प्रकारचा संबंध नसतो.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP