अर्थालंकार - विशेष
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
प्रसिद्ध आधार विनाहि जेव्हां ।
आधेय राहेच विशेष तेव्हां ॥
अस्तास जातां रविरश्मि त्याचे ।
दीपस्थ नाशा करिती तमाचे ॥१॥
आर्या-
पाण्याशिवाय कमलचि कमलीं कुवलय तशींच हीं दोन ।
कनकलतेवर, तीही सुंदर उप्ताततति न हें सान ॥२॥
येथें सहजगत्या पाहिलें असतां आधारांवाचून आधेय आहे असें दिसतें, परंतु सुवर्ण लताच कीं काय अशा स्त्रीचें संबंधानें पाहिलें
असतां ह्या गोष्टी यथार्थ आहेत असें दिसतें.
श्लोक-
स्वर्गस्थ झाल्यावरि ही जयाच्या वाक्श्रेणि भांडारचि ज्या गुणाच्या ॥
कल्पावधी रंजवितात लोकां । कवी अहो वंद्य न होत ते का? ॥३॥
आर्या-
गेलासि न हृदयांतून दिसतोसी तूं चहूंकडे रामा ॥
वत्सा गेलासि असा सूचवी संताप सज्जनविरामा ॥४॥
जेव्हां एकचि वस्तू अनेक ठायीं दिसे विशेष तरी ॥
अंतर्बाह्य मला ती मागें दिसते पुढेंही ती नारी ॥५॥
एकाच्या आरंभी केली जाते अशक्य वस्तु दुजी ॥
तेव्हां विशेष तुजला पाहुन कल्पद्रु देखिला आजी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP