अर्थालंकार - मुद्रा
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
जरि सूचनीय अर्था प्रस्तुत पर शब्द सुचविती तरि ती ॥
मुद्रा नितंब जीचे गुरु तरुणी नेत्रयुग्म विपुला ती ॥१॥
गद्य-
येथें नायिकेचें वर्णन संबंधानें " युग्म विपुला " हें पद घातलें आहे. परंतु या पदानें या अनुष्टुप् वृताचें नांव सुचविलें आहे. याप्रमाणें रत्नमालेमध्यें त्या त्या रत्नाचे नांवानें त्या त्या नांवाची जाती सुचविलीं आहेत. याप्रमाणेंच नाटकांमध्यें पुढें सांगावयाचा अर्थ जेव्हां
सुचविला जातो तेव्हां हाच आलंकार होतो .
आर्या-
न्यायें वागे त्याचे होती पशुपक्षिही सहाकारी ॥
अन्यायें वागे त्या बंधूही होतसे अहितकारी ॥१॥
गद्य-
अनर्घ्यराघव नाटकाचे आरंभीच हें सूत्रधाराचें वचन आहे. यांत रामरावणाचें कथानक सुचविलें आहे. त्या प्रमाणेंच वेणीसंहार नाटकाचे आरंभीच सूत्रधार ह्णणतो.
आर्या-
सत्पक्ष मधुरवाणी प्रसाधिताशचि मदोत्कटाचार ॥
पडतात धार्तराष्ट्रचि कालवशेंकरुनिया धरित्रिवर ॥१॥
गद्य-
यांत शरदृतूचें वर्णन करतांना धार्तराष्ट्र ह्णणजे हंस यांचें वर्णन करुन धार्तराष्ट्रसुताचे भावी नाशाविषयींही सुचविले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP