अर्थालंकार - सामान्य
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या -
सामान्य भेद दिसतो सादृश्यीं परि विशेष न दिसेची ॥
पद्माकरांत शिरल्या यास्तव दिसलीं मुखें न रमणीचीं ॥१॥
रत्नस्तंभी पडलीं प्रतिबिंबें शेकडों तिहीं दिसला ॥
आवृत दशकंधर तो सभेमधें अंगदे न जाणितला ॥२॥
गद्य-
येथें कमलें व मुखें एकसारखीं असल्यामुळें निरनिराळी दिसलीं; परंतु हें कमल व हें मुख अशीं विशेष ओळखतां आलीं नाहींत.
त्याप्रमाणेंच रत्नाचे स्तंभांत रावण व त्यांची प्रतिबिंबें निरनिराळी दृष्टीस पडलीं, पण अमुकच खरा रावण व बाकींचीं प्रतिबिंबें असें समजले नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP