मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार| असंगती अर्थालंकार उपमा अनन्वय उपमेयोपमा प्रतीप रुपक परिणाम उल्लेख स्मरण भ्रांतिमान् संदेह अपन्हुति उत्प्रेक्षा अतिशयोक्ति तुल्ययोगिता दीपक आवृत्तिदीपक प्रतिवस्तूपमा दृष्टांत निदर्शना व्यतिरेक सहोक्ति विनोक्ति समासोक्ति परिकर श्लेष अप्रस्तुतप्रशंसा प्रस्तुतांकुर पर्यायोक्त व्याजस्तुती व्याजनिंदा आक्षेप विरोधाभास विशेषोक्ति विभावना असंभव असंगती विषम सम विचित्र अधिक अल्प अन्योन्य विशेष व्याघात कारणमाला एकावली मालादीपक सार यथासंख्य परिवृत्ति पर्याय परिसंख्य विकल्प समुच्चय कारदीपक समाधि प्रत्यनीक काव्यार्थपत्ति काव्यलिंग अर्थांतरन्यास विकस्वर प्रौढोक्ति संभावना मिथ्याध्यवसिति ललित प्रहर्षण विषादन उल्लास अवज्ञा अनुज्ञा लेश मुद्रा रत्नावली तद्रूण पूर्वरुप अतद्रूण अनुगुण मीलित सामान्य उन्मीलीत विशेषक उत्तर सूक्ष्म पिहित व्याजोक्ति गूढोक्ति विवृतोक्ति युक्ति लोकोक्ति छेकोक्ति वक्रोक्ति स्वभावोक्ति भाविक उदात्त अत्युक्ति निरुक्ति प्रतिषेध विधि हेतु प्रत्यक्षप्रमाण अनुमान उपमानप्रमाण शब्दप्रमाण अर्थापत्ति अनुपलब्धि संभव ऐतिह्य अनुकूल आशी रसवत् प्रेय ऊर्जस्वित् समाहित भावोदय भावसंधि भावशबलता संसृष्टि संकर चेतनगुणोक्ति अर्थालंकार - असंगती काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण असंगती Translation - भाषांतर श्लोक-जैं भिन्न देशत्व विरुद्ध भासत । हेतूंत कार्यांत असंगतीच ते ॥पीती विषा अंबुदवर्ग जेधवां । पांथस्त्रिया मूर्छित होति तेधवां ॥१॥गद्य-यांत "विष" शब्दाचा अर्थ घेतलां असतां जी असंगती वाटते तिचा ’जल’ हा केल्याने निरास होतो. परदेशीं पति असतां त्याची पर्जन्यकाल लागण्याचे पूर्वीच घरीं येण्याची वाट असते.परंतु पर्जन्यकाल लागला आणि पति आले नाहींत ह्णणजे निराश होऊन विरह करुन स्त्रिया मूर्छित होतात. अशा अर्थाचें वरील पद्य आहे. तसेंच:-आर्या-खलरुप भुजंगाचा मारायाचा विचित्र विधि जाणा ॥एकाचे कानाचा चावा घेतां दुजा मुके प्राणा ॥२॥श्लोक-आरोहसी नित्य नळाचिये जरी । संकल्पसोपान-परंपरेवरी ॥धापा बहू टाकितसे थकून तो । ध्यानें तुझ्या त्वस्वरुपास पावतो ॥३॥आर्या-तो वीर रुद्र नरवर धारण करि जेधवां धराभार ॥सामंत राजयांचीं शिरें निरंतरचि वाकलीं फार ॥४॥करणें असून एकीकडे कृती हो दुजेकडे जेव्हां ॥एक कराया सजतां विरुद्ध । कृति तरि असंगति तेव्हां ॥५॥श्लोक-अपारिजाता वसुधा कराया । केला तसा स्वर्गहि देवराया ! ॥प्रवृत्त गोत्रोद्धरणास होशी गोत्राचिये तैं दलना करीशी ॥६॥गद्य-अरिजात नाहीसें करण्याकरितां कृष्णानें नंदनवनांतून पारिजातक वृक्ष उघडून आणिला, वराहावतारीं समुद्रांत बुडालेली पृथ्वीवर आणतांना खुरांचे योगानें वराहानें पर्वताचे चूर्ण केलें इत्यादि अर्थ श्लिष्टपदानें दाखविले आहेत. श्लोक-खडें तुझ्या वघियले रिपु तत्स्त्रियांचे ॥झाले विलक्षणचि भूषणसंघ त्यांचे ॥नेत्रांत कंकण उरावर पत्रवेल ॥चोलेंद्र सिंव्ह ! तिलकांकित हस्तजाल ॥७॥गद्य-यांत "कंकण" व " तिलक" हे दोन शब्द श्लिष्ट आहेत. "कंकण" जलकण अथवा बांगडा. तिलक-टिळा किंवा तिलयुक्त जल. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP