अर्थालंकार - छेकोक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
लोकोक्ति अर्थांतर सूचवीते । छेकोक्त्यलंकारचि बोलती ते ॥
भुजंग जो तोचि भुजंगपायां । जाणे सख्या कोण दुजा तरी या ॥१॥
मलयगिरीचे वायू गेले विकासित मालती ॥
परिमल-भर-ग्रीष्में केलें पलायन मागुती ॥
जलधर जरी इच्छीसी तूं करी पतिभेट ती ॥
जरि परतवी धेनू त्याला धनंजय बोलती ॥२॥
हें आंध्रजातींतील प्रसिद्ध लोकप्रवादाचें अनुकरण आहे. अति सौंदर्यशाली जी स्त्री तिला सोडून धनेच्छेनें जो देशांतरास जातो तो-केवळ पशू, व त्यास मागें परतविणारा धनास जिंकणारा, असेंच समजावयाचें; असें यांत अर्थांतर गर्भित होतें. या अलंकारास कितीएक स्तोकोक्ति असें ह्णणतात.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP