अर्थालंकार - परिसंख्य
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
परि संख्या एकातें निषेधुनि वस्तु योजना जरि हो ॥
दुसर्यांत, जसें श्नेह-क्षय दीपीं कामिनी-हृदीं नचि हो ॥१॥
येथें कामिनीचें हृदयांत स्नेहाचा क्षय होत नाहीं, दीपांत होतो.
असें हृदयांत निषेधून स्नेहक्षयाची योजना दीपांत केली आहे.
श्लोक-
जेथें श्रुति-मार्ग विलंघिताती । लीलावतींचीं नयनोप्तलें तीं ॥
जेथें धरीना ऋजुतेस एक । अहो महाकाल-जटा मृगांक ॥२॥
येथें श्रुतीमार्ग (वेदमार्ग किंवा कर्ण व नेत्र यांचे मधली जागा विलंघन करण्याची क्रिया नयनांत मात्र ठेविली आहे; आणि वेदमार्ग
मोडणारा कोणीच नाहीं असें दर्शविलें आहे. याप्रमाणेंच वक्रतांचंद्रामध्यें मात्र आहे, बाकी कोठेंही नाहीं; असें दर्शविले आहे.
याप्रमाणेंच:-
आर्या-
हरिभक्त मंदिरीं त्या केवळ मणिदीप मात्र अस्नेह ॥
शांत तम:क्षय पटु शुचि याचि गुणें स्वजठरीं भरी गेह ॥३॥
बृहद्दशम.
गद्य-
प्रतापरुद्रकारांनीं असें ह्मटलें आहे. जेव्हां एक वस्तु अनेक ठिकाणीं राहण्याचा संभव असून एकाच ठिकाणीं नियमानें धरिली जातें तीस परिसंख्यालंकार ह्णणावें ह्याचे
१ प्रश्नपूर्विका.
२ अप्रश्नपूर्विका
असे दोन भेद आहेत.
त्यांतही प्रत्येकाचे शाब्दवर्जनीया व अर्थवर्जनीया असे दोन भेद गणिले आहेत.
जसें:-
श्लोक-
रे कोणतें सुदृढ भूषण मानवाला ? ।
कीर्तीच भूषण असें नच रत्नमाला ॥
कर्तव्य कोण बुध जे बहु आचरीती ? ।
कर्तव्य पुण्यचि सदां नच पाप-जाती ॥४॥
गद्य-
ही शाब्दवर्जिका प्रश्न पूर्विका.
आर्या-
काय करावें ? पुण्यचि सेवावा काय ? सत्समागमची ॥
घ्यावा कोण ? सदा हरि इच्छावें काय ? विष्णुचें पदची ॥५॥
गद्य-
ही अर्थवर्जिका प्रश्नपूर्विका.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP