अर्थालंकार - विषम
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
अनुरुप वस्तु नसतां योग तयांचा तरी विषम जाण ॥
कोठें शिरीषकुसुमापरि मदु तन ही कुठें मदनबाण ॥
श्लोक-
अशुभ परशू कोथ पूत तें गोत कोठें ॥
कठिण धनुहि कोठें निर्मला चाल कोठें ॥
अढय-समर योग्या हीं कुठें बाणलीला ॥
कुशकिसलयुक्ता ती कुठे पर्णशाला ॥२॥
जरि तुज शशि वाटें ! तन्मुख श्री असावी ॥
पुनरपि तरि काया अब्धिमाजी धुवावी ॥
सुरतरुकुसुमांचा वास लावी निजांगा ॥
नच तरि मुख कोठें तूंहि कोठें वदे गा ॥३॥
अनुष्टुप् - विरुप काय उपज विषमालंकृती तरी ॥
श्याम वण तुझ्या खडापासना कित पांढरी ॥४॥
आर्या-
इष्टार्थ यत्न करितां अनिष्ट साध तरी विषम त्यास ॥
अहिपेटीला पाहुन खाया शिरतांच मृत्यु मुषकास ॥५॥
श्लोक-गोपाल तूं जाणुनि देवराया । केला तुझा आश्रय दुग्ध प्याया ॥
गोदुग्ध नाहींच मला मिळालें । मातृस्तनक्षीर अलभ्य झालें ॥६॥
भूमीवरी केसरिच्या भयानें । नभीं शशी आश्रयिला बहूत लागे ॥७॥
जाळावया मारुति-शेंपुटाला । इच्छा बहू हो दशाननाला ॥
लावीतसे अग्नि दशास्य जेव्हां । लंकापुरी - दाहचि होय तेव्हां ॥८॥
करुनिया नित्य मनोरथांतें । म्यां वाढविलें मदना वृथा ते ॥
ओढून आकर्ण तुवां धनूला । माझेवरी मार्गण योजियेला ॥९॥
पद्मातपत्र-रसिके सरसीरुहाचें ।
तूं बीज टाक सलिलांत न वापिकेचे ॥
मूर्खे ! कृतघ्न जग हें कलि-काल आला ।
हें पद्म जिंकिल तुझ्याच मुखश्रियेला ॥१०॥
कृष्णा तूं दमला सोड गिरि हा आह्मी धरुं याजला ।
ऐसें ऐकुन गोपशब्द हरिनें तो हात केला ढिला ॥
तों झाले भुज वांकडे विततही पाहून गोपालकां ।
येई ते समयीं हसे नरवरा भारी जगन्नायका ॥११॥
जावा कलंक ह्णणुनी मृगलांछनानें ।
त्वद्वकरुप धरिलें, तिलकछलानें ॥
तेथेंहि लाविशि कलंक तयास तन्वी ।
नारी समाश्रित जनास कलंक लावी ॥१२॥
पुत्रास्य तें नच कदा दिसलें जयाला ॥
झाला अनुग्रहचि शाप मला दयाला ॥
शेतार्थ भूमि अवघी जरि जाळतो तो ॥
बीजांकुरार्ह तिज पावक हो करितो ॥१३॥
आर्या-
आजकडे पाठविली दूती त्याशींच ती निरत झाली ॥
मन्मूर्खत्व सख्यानो ! दुर्दैवाची कशी गति उदेली ॥१४॥
जाणुन नपुंसक असें प्रियेकडे मीं मनास पाठविलें ॥
तें तरि तिथेंच रतलें पाणिनीनें हा । अह्मांस फुसवीलें ॥१५॥
वैथ्याकारण पाणिनीनें " मन " हा शब्द नपुंसकलिंगी घेतला आहे. त्याचें वचन सत्य मानून, मीं प्रियेकडे नपुंसक जें मन त्याला
पाठविले असतां तें तिकडेच रममाण झालें. असंभवनीय अशी वाटलेली गोष्ट खरोखरी घडली यावरुन पाणिनीचें वचन खोटें अशी
प्रतीति आली; आणि यामुळें फसविलें असा उद्गार निघाला आहे.
कोठें दरिद्र हा मी कोठें लक्ष्मीनिवास तो स्वामी ॥
आलिंगिलें भुजजांहीं प्रेमें वक्षस्थळीं रमा धामीं ॥१६॥
बृहद्दशम.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP