मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
रत्नावली

अर्थालंकार - रत्नावली

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
जेव्हां क्रमानें प्रकृतार्थ येती । रत्नावली जाण अलंकृती ती ॥
वाटे नृपाला चतुरास्य तूंच । लक्ष्मीपती तूं जगदीश साच ॥१॥

गद्य-
येथें दुसरे चरणांत चतुरास्य इत्यादी पदांनीं ब्रह्माविष्णु, व  महेश प्रसिद्ध पाठाप्रमाणें दर्शविलेले आहेत.

श्लोक-
लीलाब्जांना नयनकमलें पत्र वादार्थ देती ॥
गंडांशी हे कुच सुतनुचे पूर्वपक्षा करीती ॥
भ्रूचेष्टांचा मदनधनुशीं जैं अनूवाद झाला ॥
वक्रजोत्स्ना हिमकररुचीलागि द दूषणाला ॥२॥

गद्य-
येथें पत्रदान, पूर्वपक्षोपन्यास, अनुवाद व दूषणोद्भावन हीं बुधजनाचे प्रसिद्ध क्रमानें गोठविलेलीं आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP