अर्थालंकार - परिवृत्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
न्यूनाधिक वस्तूंची हो अदलाबदल त्या परिवृत्ति ॥
सोडुन कटाक्षशर तो हरितो अरिची समग्र संपत्ति ॥
वृद्ध जटायूला हो स्वर्गति यामाजि शोचनीय न हो ॥
जर्जर वपुच्या त्यागें ज्यानें संपादिलें विमल यश हो ॥
स्वामी पुण्ययश विपुल घेऊनिहीं म्यां तुह्मां धरा विकिली ॥
उघडलि जी कपाट स्वर्गाचें ती जिवीं धरावि किली ॥३॥
घनाक्षरी -
शत्रु - सर्पाचा र्सुपण । निद्रा मागें घटकर्ण ॥
बेगड घे त्यजी स्वर्ण । भ्रमविला त्या क्षणीं ॥४॥
घनाक्षरी रामायण.
गद्य-
साहित्यदर्पणकाराच्या मतें सम वस्तूंची अदलाबदल झाली असतांसुद्धां हा अलंकार होतो. असें आहे. जसें : -
आर्या-
मृगनयनेनें देउन कटाक्ष माझे मनास हो हरिलें ॥
मीं पण हृदय देउन कुसुमशराचे ज्वरास पतकारिलें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP