अर्थालंकार - परिणाम
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
एकें जागीं दुसरें कल्पी प्रकृतोपयोग हो ह्णणुनी ॥
परिणाम तो प्रसन्नें दृक्कमले पाहते मला रमणी ॥१॥
प्रकृतस्थलीं उपयोग व्हावा ह्णणून विकासित कमलें पाहून कोणीं
एका पुरुषानें ती विकासित कमलें सुंदरीचे प्रसन्न नेत्रच आहेत,
असें मानिलें आहे; आणि त्यांनी ती सुंदरी मजकडे पाहते, असें
दर्शविलें आहे.
श्लोक-
शिरें पदा ऊपरि सत्व हीनें । जाणो फुलें अर्पियलीं अहीनें ॥
केला असा तो फणि नम्र देवें । हरुनि त्याचा मद वासुदेवें ॥२॥
कालियामर्दन.
श्रीहरीस करिती नमनातें । तत्पदीं करुनि लीन मनातें ॥
अर्पिती पति-फणा-सुमनातें । प्रार्थिती स्वपति-संयमनातें ॥३॥
कालियामर्दन.
जवळ सुमनें नसल्याकारणानें नागपल्यांनीं पती जो कालिया त्याचीं
शिरेंच फुलाचे ऐवजी वाहिलीं आहेत, अशा अर्थाचे हें पद्य आहे.
सीता सौमित्रिसंगें तरुन सुरनदी रामराजा गुहातें ॥
भाडें द्यावें ह्णणूनी निज-अनुज-करा तत्करीं दे स्वहातें ॥
व्याधांच्या बायकांनी विकसित-नयनीं कौतुकें पाहिला जो ॥
जाई तो चित्रकूटा निरखून नयनीं काम कां त्या न लाजो ॥४॥
गंगा उतरुन पलीकडे गेल्यावर गूहकास नांवेचें भाडें द्यावें, असा
विचार करुन रामानें तें न मिळाल्यामुळें लक्ष्मणाचा हात त्याचे हातांत
घातला. येथें सौमित्रीची मैत्री हेंच भाडें असें मानिले आहे.
रामचाप-निगमा इथें शिके । त्रासवी असुर-संघ सायकें ॥
यज्ञ-रक्षण-विधिस्थ चातुरी । हीच आज गुरु दक्षिणा करी ॥
आर्या-आलों दुरुन यास्तव हास्यो पायनचि ठेविलें पुढतीं ॥
स्तनपीडन परिरंभण द्युतीं पण हाच करि सखी होती ॥
तूं पात्र गाधिजाला सदुपायन करुनि देहनुतितें हो ॥
हरि वारंवार असें स्वकरोंचि धरुन वदे हनु तितें हो ॥७॥
मोरोपंत.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP