आरती एकनाथाची
एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत
आरती एकनाथा ॥ महाराजा समर्था ॥
त्रिभुवनीं तूंचि थोर ॥ जगद्गुरु जगन्नाथा ॥ध्रु०॥
एकनाथनाम सार ॥ वेदशास्त्रांचें गूज ॥
संसारदुःख नासे ॥ महामंत्राचें बीज ॥आर०॥१॥
एकनाथ नाम घेतां ॥ सुख वाटलें चित्ता ॥
अनंतगोपाळाची ॥ धणी न पुरे गुण गातां ॥आर०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : August 03, 2017
TOP