चतुःश्लोकी भागवत - श्लोक २३

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
प्रत्यादिष्टं मया तत्र त्वयि कर्मविमोहिते । तपो मे हृदयं साक्षादात्माऽहं तपसोऽनघ ॥२३॥     ॥     ॥

॥ टीका ॥
कर्तव्याचें निजकारण ॥ तुज नकरवे सृष्टिसर्जन ॥ त्या काळीं म्यां आपण ॥ तप तप जाण उपदेशिलें ॥११॥
नकरवे सृष्टिसर्जन ॥ कर्ममोहें तूं अतिअज्ञान ॥ तेव्हांचि म्यां कृपेनें पूर्ण ॥ तप तप संपूर्ण उपदेशिले ॥१२॥
त्या तपाची जाण महादीप्ती ॥ तपामाजीं परमशक्ती ॥ तपें उपजे ज्ञानस्थिती ॥ जाण निश्चितीं विधात्या ॥१३॥
साधुनी अंतरंग तप ॥ तपें पूर्णज्ञानस्वरूप ॥ तपें होइजे सद्रूप ॥ तपें निष्पाप झालासीं तूं ॥१४॥
अस्तित्व निश्चयें पूर्ण ॥ नित्य वाहे अंतःकरण ॥ यानांव गा तप जाण ॥ शरीरशोषण नव्हे तप ॥३१५॥
यापरि तप ज्ञानरूप ॥ ऐकें त्या तपाचा प्रताप ॥ तपोबळें मी चिद्रूप ॥ सृष्टी अमूप धडीं मोडी ॥१६॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP