मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक ३० टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३० एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक ३० Translation - भाषांतर यावत्सखा सख्युरिवेश ते कृतः प्रसाविसर्गे विभजामि भोजनम् ॥ अविक्लवस्ते परिकर्मणि स्थितो मा मे समुन्नद्धमदोऽजमानिनः ॥३० ॥ ॥ टीका ॥अहं मद कां होईल ह्मणसी ॥ तुवां मज अहंकारियासी ॥ सखा मानोनि सख्यासी ॥ ऐसिये स्थितीसी आणिलें त्वां ॥५६॥म्यां प्रजासृष्टि करावी ॥ तेथें माझी श्रद्धा रिघावी ॥ यालागीं केली स्वभावीं ॥ निजगौरवीं मानेल पैं ॥५७॥ऐसियावरी सृष्टि करितां ॥ अहं स्वतंत्र प्रजाकरितां ॥ ऐसी माझे उत्कट अहंता ॥ अंगीं तत्त्वतां वाढेल कीं ॥५८॥श्रेष्ठापासूनी सन्मान ॥ तोचि इतरांसी हृदयाभिमान ॥ तेणें धाकें कांपलें मन ॥ तुज गुह्यज्ञान यालागीं पुसें ॥५९॥तुझे आज्ञे उल्लंघ न घडावा ॥ यालागीं सृष्टिक्रम म्यां सृजावा ॥ तोचि मानितां तुझी सेवा ॥ अभिमान नीच नवा मजमाजीं उठी ॥३६०॥अभिमान यावयाचें काय कारण ॥ सृजितां अधमोत्तमयोनीजन ॥ मी सृष्टिकरितां तुजसमान ॥ अवश्य अभिमान येईल स्वामी ॥६१॥वृत्ति करूनियां अविकळ ॥ सृजितां भूतजात सकळ ॥ तोचि अभिमानाचा जन्मकाळ ॥ हें मज समूळ कळे देवा ॥६२॥तो अभिमान मज न यावा ॥ यालाईं प्रार्थितसें तुज द्वा ॥ आश्वासी पां ज्ञानगौरवा ॥ श्रीवासुदेवा निजजनका ॥६३॥ऐकोनी ब्रह्म्याची विनवण ॥ परम संतोषला नारायण ॥ त्यासी द्यावया निजज्ञान ॥ स्वानंदपूर्ण तुष्टला असे ॥६४॥कोण्हाचें न लागतां मन ॥ अनिष्ठित गुह्यज्ञान ॥ तें द्यावया श्रीनारायण ॥ स्वानंदें पूर्ण संतुष्टला ॥३६५॥करितां नानाकर्माचरण ॥ निजांगीं नलागे कर्तेपण ॥ ऐसें अलिप्त निजज्ञान ॥ द्यावया श्रीनारायण संतुष्टला ॥६६॥देखोनी तेव्हां ब्रह्मयासी ॥ अतिस्नेह भगवंतासी ॥ निजज्ञानधनदेतसे त्यासी ॥ जन्मला कुशीं ह्मणवूनियां ॥६७॥जैसा दिपला हरिणा पुढें ॥ पाहोंविसरला आणिकेकडे ॥ तैसा आवडीच्यानि पडिपाडें ॥ ब्रह्मयाकडे हरि पाहे ॥६८॥कां चुंबकाचिया वाटा ॥ लोह भवे न लागतां झटा ॥ तैसें झालें हो वैकुंठा ॥ जिकडे पाहे स्रष्टा तिकडे देव ॥६९॥जेवीं आदित्याचींफुलझाडें ॥ नित्य सन्मुख सूर्याकडे ॥ तेवीं आवडीचेनि पडिपाडें ॥ चतुर्मुखापुढें सन्मुख देख ॥३७०॥उफराटी हे चाली कैशी ॥ शौरी भुलला स्रष्ट्यासी ॥ येणें आवडलेपणें त्यासी ॥ गुह्यज्ञानासी सांगेल पां ॥७१॥सांगावया त्या गुह्यज्ञानवाव ॥ स्वयें तुष्टला श्रीवासुदेव ॥ येणें विरिंचीचा जीवभाव ॥ स्वयें स्वयमेव चमत्कारला ॥७२॥पुढिलें निरोपणीं आवडी ॥ स्रष्टा उठिला धडफुडी ॥ अवधानाची परवडी ॥ निजनिवाडीं थोरावली पैं ॥७३॥देहावेगळें अंतःकरण ॥ करूनि निवडिलें अवधान ॥ श्रवणीं एकाग्रता पूर्ण ॥ स्वयें संपूर्ण सरसावला ॥७४॥अष्टदळें जैसीं कमळें ॥ तैसे टवकारिले आठही डोळे ॥ चारी मुखें एकेवेळें ॥ सप्रेममेळें लांचावली ॥३७५॥श्रीगुर्श्रीहरी तुष्टमान ॥ देखोनि उठावले ते नयन ॥ श्रवणापूर्णीं आपण ॥ दृश्यभेदाविण निजज्ञान सेवूं ॥७६॥श्रवणीं ऐसें तें शुभाक्षर ॥ आह्मीच सेऊं साचार ॥ ऐसा दृष्टीचा चमत्कार ॥ देखणेपणें द्वार श्रवणाचें व्यापी ॥७७॥घ्राण ह्मणे मी सवेगें ॥ सुगंधवृत्तीसी धांवेन वेगें ॥ श्रवणनयनांपुधें लगबगें ॥ उभे स्वानंदयोगें सुखेंसी पैं ॥७८॥ऐकोनी सद्गुरूच्या गुह्यज्ञाना ॥ रसना विसरे विषयवासना ॥ नचाखतां सद्गुरुगुह्यज्ञाना ॥ ब्रह्मरस रसना सेवूं धावे ॥७९॥स्पर्श पांगला शरीरपांगे ॥ देहबुद्धीसी घालूनि मागें ॥ स्पर्शावया लागवेगें ॥ मी रिघोन सर्वांगें श्रीरंवसंगीं ॥३८०॥धन्य धन्य श्रीगुरुसप्रेमज्ञान ॥ बाह्यांसी येतसे स्फुरण ॥ खेंव द्यावया आपण ॥ भुजाहि सच्चिद्ध आलिंगूं पाहती ॥८१॥ऐसा इंद्रियांचा विवाद ॥ ऐकोनि शब्द जाहला निःशब्द ॥ मोनें सेवावया परमानंद ॥ हरिनामाचा छंद सर्वांगीं गर्जे ॥८२॥ऐसा सर्वांगीं परिपुरता ॥ सर्वांगें जाहला धडौता ॥ यापरी देखोनि विधाता ॥ कळलें भगवंता परमार्थीं ॥८३॥श्रवणीं जें पडेल वचन ॥ तें तत्काळचि होईल आपण ॥ यालागीं निजगुह्यज्ञान ॥ श्रीनारायण उपदेशी ॥८४॥ऐसा पुरता जो असेल ॥ त्यासि सद्गुरुज्ञान गवसेल ॥ येर्हवीं आहाच बोलतां बोल ॥ वाचेचें फोल करावें नलगे ॥३८५॥यालागीं श्रद्धाळू सात्विक । गुरुसेवेचा नीच सेवक ॥ गुरुआज्ञेचा पाइक ॥ तोचि निष्टंक ज्ञानार्थीं ॥८६॥जो वीतरागी सविवेक ॥ जो सद्भावें विश्वासिक ॥ जो लोकेषणेरहित रंक ॥ तो निष्टंक ज्ञानार्थीं ॥८७॥विकल्पशून्य ज्याचें मन ॥ वासनारहित निजभजन ॥ तो मुमुक्षांमाजीं चिद्रत्न ॥ अधिकारी पूर्ण ब्रह्मज्ञाना ॥८८॥ऐशीं विधात्याचीं पूर्ण लक्षणें ॥ निर्धारूनि श्रीनारायणें ॥ त्यासि पूर्णब्रह्म निरूपणें ॥ ज्ञानार्थ परिसणें सावधान श्रोतीं ॥८९॥हें कल्पादीचें जुनाट ज्ञान ॥ स्वयें श्रीनारायण ॥ एका विनवी जनार्दन ॥ श्रोतीं अवधान मज दीजे ॥३९०॥ References : N/A Last Updated : July 30, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP