मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक १८ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक १८ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक १८ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥ ननाम पादांबुजमस्य विश्वसृग्यत्पारमहंस्येन पथाऽधिगम्यते ॥ तं प्रीयमाणं समुपस्थितं तदा प्रजाविसर्गे निजशासनार्हणम् ॥१८॥ ॥ टीका ॥जीं परहंस प्रांजळें ॥ योगवैराग्यज्ञानबळें ॥ पाविजेती हरीचीं पादयुगुळें ॥ ती चरणकमळें वंदिली भावे ॥७७॥जे वेदविवेकव्यूत्पत्तीं ॥ जाणॊनी सद्भावें भक्ति करिती ॥ ते भगवच्चरण पावती ॥ ते प्रजापती वंदिता झाला ॥७८॥हरिचरणद्वंद्वयुगुळें ॥ वंदितांची भावबळें ॥ निर्द्वंद्व करिती तात्काळें ॥ तीं चरणकमळें वंदिलीं ॥७९॥हरिचरणपदद्वंद्व ॥ वंदितां करी निर्द्वद्व ॥ यालागीं स्रष्टां स्वानंद ॥ भगवत्पद स्वयें वंदी ॥८०॥भावें वंदितां हरिचरण ॥ जगाचा स्रष्टा झाला आपण ॥ नकरवे ह्मने सृष्टिसर्जन ॥ त्या जगाचें दर्शन विधाना देखे ॥८१॥नरचिंता भूतभौतिककोटी ॥ स्रष्टा देखे सकळ सृष्टी ॥ यालागीं विश्वदृक्दृष्टी ॥ ब्रह्म्याची नामाटी सत्यत्वा आली ॥८२॥करितां हरिचरणीं नमन ॥ विश्वद्रष्टा झाला आपण ॥ विश्वदृक् नामाभिधान ॥ ब्रह्म्यासी जाण याहेतूं ॥८३॥ब्रह्मा सद्भावें आपण ॥ साष्टांग घाली लोटांगण ॥ तो भाव देखोनी नारायण ॥ स्वानंदें पूर्ण संतुष्टला ॥८४॥येऊनी ब्रह्मयाजवळी ॥ कृपें अवलोकीं वनमाळी ॥ संतुष्ट होउनी त्याकाळीं ॥ ह्मणे याची झाली परिपक्कदशा ॥२८५॥एवं करावया सृष्टिसर्जन ॥ स्रष्ट्यासी स्वाधिकारीं पूर्ण ॥ स्थापावया श्रीनारायण ॥ आइका निजाश्वासन बोले तें ॥८६॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP