चतुःश्लोकी भागवत - श्लोक १९

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
बभाष ईषत्स्मितरोचिषा गिरा प्रियः प्रियें प्रीतमनाः करे स्पृशन् ॥१९॥

॥ टीका ॥
बह्म्याच्या प्रीती पावला ॥ प्रियवंतापरिस प्रिय मानला ॥ प्रीतीकरूनि करीं धरिला ॥ प्रियकर झाला परमेष्ठी ॥८७॥
जो शुद्ध बोलिला निःशब्दाचा ॥ वाचिक विश्वतोमुखाचा ॥ ज्याचेनी प्रकाशती चारी वाचा ॥ तो वेदवाचा बोलता झाला ॥८८॥
तो शब्दाचें निजजीवन ॥ ज्याचेनी वाचा दैदीप्यमान ॥ तो स्वयें होऊनि भगवान ॥ हास्यवदन करूनि बोलत ॥८९॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP