चतुःश्लोकी भागवत - श्लोक ४०

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


प्रजापतीधर्मपतिरेकदानियमान्यमान् ॥ भद्रं प्रजानामन्विछन्नातिष्ठत्स्वार्थकाम्यया ॥४०॥    

॥ टीका ॥
जे प्रजांते सृजूं शकती ॥ ऐसियांची करी हा उत्पत्ती ॥ यालागीं ब्रह्मयाते ह्मणती ॥ प्रजापति पति पुराणें तीं ॥७३॥
लोक ज्याच्या आज्ञें वर्तती ॥ सर्व लोक ज्यातें भजती ॥ यालागीं लोकपती ह्मणती ॥ जाण निश्चितीं ब्रह्मयातें ॥७४॥
स्वधर्मकर्माची व्युत्पत्ती ॥ स्वधर्मकर्माची स्थितिगति ॥ त्याचेनी वर्ते लोकांप्रती ॥ यालागीं धर्मपती ब्रह्म्यातें ह्मणिजे ॥७७५॥
धर्मकर्मआचारस्थिति ॥ प्रजा आचरूं नेणती ॥ त्यासाथीं यमनियमांची युक्ती ॥ धातां आचरी निगुती वेदोक्तविधी ॥७६॥
पोटीं नाहीं कर्मावस्था ॥ अथवा कर्मफळाची आस्था ॥ तरी कर्म आचरे विधाता ॥ लोकसंरक्षणार्था यमनियम ॥७७॥
निज प्रजांचिया निजस्वार्था ॥ कर्में आचरोनी दावी धाता ॥ स्वयें कर्म करोनि अकर्ता ॥ लोकहितार्था यमनियम करी ॥७८॥
जें जें श्रेष्ठ आचरती ॥ तें तें कर्म इतर करिती ॥ यालागीं यमनियम प्रजापती ॥ आचरे अनहंकृती लोकसंग्रहार्थ ॥७९॥
कुलालाचे वोसरे कर्म ॥ पूर्वभ्रमें उरे चकभ्रम ॥ तेवीं जीवन्मुक्तांचे देहकर्म ॥ होतसें परम स्वभावेंपैं ॥७८०॥
नदेखोनी सकामावस्था ॥ ब्रह्मा केवळ लोकसंग्रहार्था ॥ सकळलोकहितार्था ॥ होय आचरतां स्वधर्मकर्म ॥८१॥
सद्गुरु श्रीनारायण ॥ त्याची आज्ञा कीं हे संपूर्ण ॥ करावें लोकसंरक्षण ॥ यालागीं ब्रह्मा जाण यमनियम चालि ॥८२॥
अनहंकृती स्वधर्मकर्म ॥ ब्रह्मा आचरोनी नित्यनेम ॥ येणें नारदाचा मनोधर्म ॥ उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयीं ॥८३॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP