मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक ७ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक ७ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक ७ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥निशम्यतद्वक्तृदिदृक्षया विशो विलोक्य तत्रान्यदपश्यमानः ॥ स्वधिष्ण्यमास्थाय विमृश्य तद्धितं तपस्युपादिष्ट इवादधे मनः ॥७॥ ॥ टीका ॥तप तप ऐसे बोलिला ॥ तो प्रत्यक्ष नाहीं देखिला ॥ पाहतां अदृश्य जाहला ॥ तो पांगेला दशदिशा ॥९६॥तप या अक्षरांचा उच्चारी ॥ पाहतां न दिसे देहधारी ॥ अवलोकितां दिशा चारी ॥ वक्ता शरीरी दिसेना ॥९७॥तप या अक्षरांचा वक्ता ॥ नातुडे दृष्टीचिया पंथा ॥ मग तप या वचनार्था ॥ होय विचारिता निजहृदयीं ॥९८॥ह्मणे दंतौष्ठपुटेंवीण ॥ नव्हे या अक्षराचें उच्चारण ॥ हो कां येथें बोलिला कोण ॥ देहधारी आंन दिसेना ॥९९॥तप या नांवाची काय स्थिती ॥ तपें पाविजे कोण प्राप्ती ॥ ऐसें विधाता निजचितीं ॥ तपाची स्थिति गति विवंचीत ॥१००॥तप ह्मणिजे परमसाधन ॥ येणें साधे निजात्मसाधन ॥ ऐकोनी ऐसें सावधान ॥ स्वहितस्फुरण हृदयीं स्फुरलें ॥१॥तप ह्मणिजे माझें हित ॥ तपें एकाग्र होय चित्त ॥ तपें होइजे आनंदयुक्त ॥ ऐसा निश्चितार्थ पैं केला ॥२॥जंव नाहीं केलें दृढ तप ॥ तंव नतके तपवक्त्याचें रूप ॥ आहाच कष्टतां अमूप ॥ तेणें स्वस्वरूप भेटेना ॥३॥ऐसा दृढ निश्चय मानुनी ॥ विधाता बैसे कमलासनीं ॥ जैसा प्रत्यक्ष येउनी कोण्ही ॥ हितालागोनी बैसवी ॥४॥एकांतीं शिष्यालागोनी ॥ जें गुरु उपदेशित कानीं ॥ मग तो प्रवर्ते अनुष्ठानीं ॥ तेवीं कमलासनीं विधातया ॥१०५॥तप ह्मणिजे नव्हे स्नान ॥ तप ह्मणिजे नव्हे दान ॥ तप नव्हे शास्त्रव्याख्यान ॥ वेदाध्ययन नव्हे तप ॥६॥तप ह्मणिजे नव्हे योग ॥ तप ह्मणिजे नव्हे याग ॥ तप ह्मणिजे वासनात्याग ॥ जेणें तुटे लाग कामक्रोधांचा ॥७॥शरीरशोषणा नांव तप ॥ तें प्रारब्धभोगानुरूप ॥ हरि हृदयीं चिंतणें चिद्रूप ॥ तप सद्रूप त्या नांव पैं ॥८॥जेणें दंभलोभ निःशेष आटे ॥ अहंममता समूळ तुटे ॥ यासचि नांव तप गोमटें ॥ मानी नेटेंपाटें विधाता ॥९॥तीर्थोंतीर्थींचिया अनुष्ठाना ॥ क्षमा नुपजे सज्ञानघना ॥ तेथें कोप येउनी जाणा ॥ करी उगाणां तपाचा ॥११०॥कोप तापसांचा वैरी ॥ केल्या तपाची बोहरी करी ॥ तो ज्म्व निर्दळेना जिव्हारीं ॥ तों तपाची थोरी मिरविती मूर्ख ॥११॥जरी जाहला संन्यासी ॥ तरी कामक्रोध ज्यापासीं ॥ तो प्रपंचातें दिधला आंदणासी ॥ मां इतरांसी कोण पुसे ॥१२॥जेथें कामक्रोधांचें निर्दाळण ॥ यानांव शुद्ध अनुष्टान ॥ हा निश्चय करूनि चतुरानन ॥ तपासी आपण सरसावला ॥१३॥एवं तप मानूनियां हित ॥ बुद्धिनिश्चयें निश्चितार्थ ॥ ब्रह्म तपश्चर्या करित ॥ एकाग्रचित भावार्थें ॥१४॥ ॥ ॥ ॥ ॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP