चतुःश्लोकी भागवत - श्लोक २८

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


क्रीडस्यमोघसंकल्प ऊर्णनाभिर्यथोर्णुते ॥ तथा तद्विषयां धेहि मनीषां मयि माधव ॥२८॥   

॥ टीका ॥
सकळसंकल्प तुझ्या पोटीं ॥ तुज जंव सृष्टीची इच्छा उठी ॥ तंव ब्रह्मांडांचिया कोटी ॥ चराचर दाटी स्वेच्छें दाटे ॥३२॥
ऐसें संकल्पितसृष्टीसी ॥ भुतभौतिकें तूंचि होसी ॥ नानाअवतारचरित्रेंसी ॥ तुजमाजीं क्रीडसी तूंचि देवा ॥३३॥
जैसी कातणी स्वेच्छेकरी ॥ तंतु काढी मुखाबाहेरी ॥ त्यावरीच स्वयें क्रीडा करी ॥ परतोनी निजउदरीं सामावी ते ॥३४॥
तये कांतणीपरी ऐसी ॥ तुझी क्रिया हृषीकेशी ॥ कल्पादि खेळ हा मांडिसी ॥ खेळोनी ग्रासिसी कल्पांतीं तूं ॥३३५॥
हात न माखोनी विश्व रचिसी ॥ अमायिकत्वें विश्व पाळिसी ॥ ना नासितां हें संहारिसी ॥ ऐसा होसी सत्संकल्प तूं ॥३६॥
ऐसा गुह्यज्ञान निजठेवा ॥ कृपा करूनियां मज द्यावा ॥ येच विषयीं हो माधवा ॥ मज करावा पूर्णानुग्रह ॥३७॥
वर मागावया आज्ञा दिधली ॥ यालागीं हे सलगी केली ॥ सत्य करावी ते वरदबोली ॥ सांभाळी आपुली भाक स्वामी ॥३८॥
मुळीं वरं वरय भद्रंते ॥ ऐसें बोलिलें वरदहस्तें ॥ तें सत्य करावें श्रीअनंतें ॥ गौरवी मातें निजगुह्यज्ञातें ॥३९॥
वरदेश वदोनी जरी नदेसी ॥ तरी काय करावें हृषीकेशी ॥ समर्थीं बळावें निजभाकेसी ॥ हेंचि आह्मासी भांडवल पां ॥३४०॥
तूं सत्यसंकल्प भगवंत ॥ तुझें वाक्य मिथ्या नव्हे येथ ॥ येणें गुणें भावार्थ निश्चित ॥ गुह्यज्ञानार्थ आह्मां सांगें ॥४१॥


References : N/A
Last Updated : July 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP