चतुःश्लोकी भागवत - श्लोक २१

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
वरं वरय भद्रं ते वरेशं माऽभिवांच्छितम् ॥ ब्रह्मञ्च्छ्रेयःपरिश्रामः पुंसो मद्दर्शनावधिः ॥२१॥    ॥  ॥

॥ टीका ॥
संतोषें श्रीनारायण ॥ ब्रह्मयासी ह्मणे आपण ॥ जें अभीष्ट वांछी तुझें मन ॥ तो वर संपूर्ण माग वेगीं ॥१॥
वरांमाजी वरिष्ट ॥ तुज जो वाटेल श्रेष्ठ ॥ मागतां अतिउत्कृष्ट ॥ तोही उद्भट वर देईन मी ॥२॥
तंवचि प्राणी पावती श्रम ॥ तंवचि देखती द्वंद्वविषम ॥ तंवचि भोगिती मरणजन्म ॥ जंव श्रद्धें हरिनाम नये वाचें ॥३॥
तंवचि द्वंद्वद्वेषखोडी ॥ तवंचि विषयाची गोडी ॥ तंवचि पापाची तया कोडी ॥ जंव नाम अवघडी नये वाचें ॥४॥
तंवचि भवभय लागे पाठी ॥ तंवचि मदमोह महाहटी ॥ तंवचि अविद्या हे लाठी ॥ जंव मातें निजदृष्टी देखिलें नाहीं ॥३०५॥
तंवचि कामक्रोधाची गोष्टी ॥ तंवचि कल्पना नांदे पोटीं ॥ तेंवचि अहंतेची दृढ गांठी ॥ जंव प्रातें दृष्टी देखिलें नाहीं ॥६॥
सकळ आश्रयांची अवधी ॥ प्राणियांसी दर्शनसिद्धी ॥ मज देखिलिया त्रिशुद्धी ॥ आधिव्याधि बाधूं नशके ॥७॥
माझें नाम नाशी दुःख कोटी ॥ त्या मज देखिलिया निजदृष्टीं ॥ संसार पळे उठाउठी ॥ आश्रमाची गोष्टी उरे कोठें ॥८॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP