चतुःश्लोकी भागवत - श्लोक २४

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


सृजामि तपसैवेदं ग्रसामि तपसा पुनः ॥ बिभर्मि तपसा विश्वं वीर्यं मे दुश्चरं तपः ॥२४॥     ॥  ॥

॥ टीका ॥
ज्ञानतपाची पाहा थोरी ॥ तेणें तपें मी श्रीहरी ॥ सृष्टि सृजीं पाळीं संहारीं ॥ अंगींच्या अंगावरी अलिप्तपणें ॥१७॥
ऐसें तपाचें वीर्य पूर्ण ॥ नेणती देहाभिमान ॥ यालागीं त्यांसी तपाचरण ॥ दुस्तर जाण परमेष्टी ॥१८॥
ज्यांसीं विषयवासना संताप ॥ त्यांसी नकळे तपाचें निजरूप ॥ तें तूं आचरोनियां तप ॥ होऊनि मातें आप पावलासी पैं ॥१९॥
ऐसें बोलिला नारायण ॥ तेणें हरिखला चतुरानन ॥ पाहोनियां हरीचें वदन ॥ काय आपण बोलत ॥३२०॥


References : N/A
Last Updated : July 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP