मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक १७ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक १७ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक १७ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥ युक्त भगैः स्वैरितरत्र वाधृवैः स्व एव धामन् रममाणमीश्वरम् ॥ तद्दर्शनाल्हादपररिप्लुतांतरो हृश्यत्तनुः प्रेमभराश्रुलोचनः ॥१७॥ ॥ टीका ॥ षड्गुणभाग्यें भाग्यवंत ॥ यालागीं बोलिजे भगवंत ॥ ज्ञानवैराग्य ऐश्वर्यवंत ॥ यशश्रीमंत औदार्येसी ॥५८॥हे साही गुण भगवंतीं ॥ सहज स्वाभाविक असती ॥ योगानें करितां भगवद्भक्ती ॥ षड्गुणप्राप्ती तत्प्रसादें पैं ॥५९॥सहज षड्गुण भगवंतीं ॥ योगियां आगंतुक प्राप्ती ॥ भक्तांते भगवंत ह्मणती ॥ जाण निश्चितीं या हेतू ॥२६०॥पावोनी षड्गुणप्राप्ती ॥ भक्तांतें भगवंत ह्मणती ॥ ऐकें तयांची नामकीर्ती ॥ संक्षिप्तस्थिती सांगेन तुज ॥६१॥वसिष्ट वामदेव नारद ॥ व्यास वाल्मीक प्रल्हाद ॥ शुक षड्गुणी प्रसिद्ध ॥ इत्यादि अनुवाद भगवद्रूप पैं ॥६२॥अगाध हरीचें उदारपण ॥ दासां देऊनियां षड्गुण ॥ भगवद्रूपीं परिपूर्ण ॥ त्यांसी भिन्नपणें न देखे स्वयें ॥६३॥देउनी षड्गुण संपत्ती ॥ भक्त भगवद्रूप होती ॥ त्यांची उरोंनेंदी भिन्न वृत्ती ॥ चिदात्मस्थिती निजबोधें ॥६४॥नवल सामर्थ्याचें औदार्य ॥ आपणासगट दे षड्गुणैश्वर्य ॥ अभिन्नज्ञानें तेजवीर्य ॥ परात्परवर्य महामहिमा ॥२६५॥मर्दुनी भक्तांचा जीवकण ॥ भेद निरसुनी दे षड्गुण ॥ स्वयें स्वरूपीं रमारमण ॥ स्वानंदमयपूर्ण परमात्मा ॥६६॥यापरी श्रीनारायण ॥ आनंदविग्रही चिद्घन ॥ त्यातें देखोनि चतुरानन ॥ विस्मयें पूर्ण जाहला असे ॥६७॥धवकरी देखिला हृषीकेशी ॥ घवकरी सत्त्व दाटलें त्यासी ॥ प्रेम नसांवरे ब्रह्मयासी ॥ सुखोर्मीसी विव्हळ होत ॥६८॥घवघवीत शामसुंदर ॥ देखतां मनीं मना विसर ॥ चढिला सुखाचा महापुर ॥ त्यामाजीं संसार बुडों पाहे ॥६९॥चित्त चिंतेसी विसरलें ॥ अहंसोहं एक जाहलें ॥ बुद्धिबोधा खेंव पडिलें ॥ भरितें दाटलें सत्वाचें त्या ॥२७०॥निजात्मज्योती लखलखिली ॥ तेणें हरिखें जीवदशा लाजिली ॥ देहीं देहत्वाची स्फूर्ति गेली ॥ विषयाची झाली पाहांट तेथें ॥७१॥मोडिलें त्रिपुटीचें विंदान ॥ मावळोंलागे विकारभगण ॥ जीवाशिवा होऊं पाहे लग्न ॥ मधुपर्कविधान शुद्धसत्वें केलें ॥७२॥गुरुकृपा अरुणोदय होत ॥ अज्ञानअंधार जाय तेथे ॥ इंद्रियें विषयीं नियुक्त ॥ तीं उठूं पाहत निजबोधें ॥७३॥कंठीं अतिबाष्प दाटला ॥ तेणें शब्दव्यवहार खुंटला ॥ गदगदोनीरोमांचित जाहला ॥ सर्वांगीं चालिला स्वेदकंप ॥७४॥अंतरीं हर्ष कोंदाटोनी ॥ आनंदाश्रु लोटले नयनीं ॥ स्फुंदे सुखोर्मींच्या स्फुंदनीं ॥ हर्षें विव्हळोनी विधाता पैं ॥२७५॥ते सत्त्वावस्था आवरोन ॥ अंगींचा स्वेद परिमार्जून ॥ ब्रह्मां सावधान होऊन ॥ वंदी श्रीचरण नारायणाचें ॥७६॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP