मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
यतिसंस्कार

तृतीय परिच्छेद - यतिसंस्कार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां यतिसंस्कार सांगतो .

अथयतिसंस्कारः स्मृत्यर्थसारे सर्वसंगनिवृत्तस्यध्यानयोगरतस्यच नतस्यदहनंकार्यंनाशौचंनोदकक्रिया तथा कुटीचकंतुप्रदहेत्पूरयेत्तुबहूदकम् हंसोजलेतुनिक्षेप्यः परहंसंप्रपूरयेत् पालाशमूलेनदीतीरेन्यत्रवागंधपुष्पालंकृतंशवंवाद्यघोषेणनीत्वा दंडमात्रंव्याह्रतिभिः खात्वासप्तव्याह्रतिभिस्त्रिः प्रोक्ष्य दर्भानास्तीर्य नवघटेपंचरत्नोदकंक्षिप्त्वा नारायणः परंब्रह्मेत्यभिमंत्र्यतेनैवसंस्नाप्याष्टाक्षरेणवस्त्रगंधपुष्पधूपदीपादीन्दत्वाविष्णोहव्यंरक्षस्वेतिशवंगर्तेनिधायेदंविष्णुरितिदक्षिणहस्तेदंडं यदस्यपारेइतिसव्येशिक्यं येनदेवाः पवित्रेणेति मुखेजलपवित्रंसावित्र्योदरेपात्रंभूमिः श्वभ्रेतिगृह्येकमंडलुंनिधायचित्तिः स्रुगितिदशहोत्राभिमंत्रयेदितिविश्वा दर्शटीकायांस्मृत्यर्थसारेच बृहच्छौनकस्तु यतिंपुरुषसूक्तेनस्नापयित्वावटंततः प्रणवेनाष्टवारंतं प्रोक्षयेदथसर्वतः विष्णोहव्यंरक्षस्वेतियजुषाप्रणवेनच गर्तेप्रेतंविनिक्षिप्यचेदंविष्णुर्विचक्रमे इतिमंत्रेणदंडंतु दद्याद्दक्षिणहस्तके मूर्धानंभूर्भुवः स्वश्चेत्युक्त्वाशंखेनभेदयेत् गर्तंपुरुषसूक्तेनलवणेनप्रपूरयेत् सृगालश्वादिरक्षार्थंसम्यग्गर्तंप्रपूरयेदिति ।

स्मृत्यर्थसारांत - " सर्वसंग परित्याग केलेला , ध्यानयोगाविषयीं तप्तर असलेला असा जो संन्यासी त्याचा दाह करुं नये , आशौच धरुं नये आणि त्याची तिलोदकदानादिक्रिया करुं नये . तसेंच - कुटीचक जो संन्यासी त्याचा दाह करावा . बहूदकाला पुरावा . हंसास उदकामध्यें टाकावा . आणि परमहंसास उत्तम प्रकारें पुरावा . " पळसाच्या मुळाशीं किंवा नदीतीरावर अथवा दुसर्‍या चांगल्या पवित्र ठिकाणीं संन्याशाचें प्रेत गंध , पुष्पें यांनीं अलंकृत करुन वाद्यघोषानें नेऊन त्या ठिकाणीं व्याह्रतिमंत्रांनीं दंडप्रमाण खळगा खणून सप्तव्याह्रतिमंत्रांनीं त्रिवार त्याचें प्रोक्षण करुन त्यांत दर्भ पसरुन नव्या मृन्मय कलशामध्यें पंचरत्नें व उदक घालून ‘ नारायणः परंब्रह्म ’ या मंत्रानें त्याचें अभिमंत्रण करुन त्याच उदकानें प्रेताला स्नान घालून अष्टाक्षरमंत्रानें वस्त्र , गंध , पुष्पें , धूप , दीप हे उपचार अर्पन करुन ‘ विष्णो हव्यं रक्षस्व ’ या मंत्रानें त्या खळग्यांत प्रेत ठेऊन ‘ इदंविष्णु० ’ या मंत्रानें प्रेताच्या दक्षिण हस्तांत दंड , ‘ यदस्यपारे० ’ या मंत्रानें वाम हस्तांत शिक्य , ‘ येन देवाः पवित्रेण० ’ या मंत्रानें मुखांत जलपवित्र , गायत्रीमंत्रानें उदरावर पात्र , ‘ भूमिः श्वभ्र० ’ या मंत्रानें गुह्याचे ठिकाणीं कमंडलु ठेऊन ‘ चित्तिः स्रुक् ० ’ या दशहोतृमंत्रानें अभिमंत्रण करावें , असें विश्वादर्शटीकेंत आणि स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे . बृहच्छौनक तर - " संन्याशाला पुरुषसूक्तानें स्नान घालून गर्त ( खळगा ) केला असेल त्याला प्रणव मंत्रानें आठवेळ चहूंकडे प्रोक्षण करावें . ‘ विष्णो हव्यं रक्षस्व ’ या यजूनें व प्रणवमंत्रानें गर्ताचे ठिकाणीं प्रेत ठेऊन ‘ इदंविष्णुर्विचक्रमे० ’ या मंत्रानें दक्षिण हस्तांत दंड द्यावा . ‘ भुर्भुवः स्वः ’ असें म्हणून शंखानें मस्तकभेद करावा . पुरुषसूक्त म्हणून मीठ घालून गर्त भरावा . कोल्हा , कुत्रा , इत्यादिकांपासून रक्षण होण्यासाठीं मृत्तिका , पाषाण वगैरे घालून चांगल्या रीतीनें मजबूत गर्त भरुन टाकावा . "

कुटीचकस्यतुदाहः कार्यः यथासर्वंप्राग्वत्कृत्वाग्निंप्रज्वाल्यसाग्नेर्दक्षिणकरेउपावरोहेत्यवरोह्यनिर्मथ्यवागर्तेचितिंकृत्वाग्निनाग्निः समिध्यतइत्यग्निंदत्वा सावित्र्याप्रणवेनवादहेत् ततोष्टशतंप्रणवं नारायणः परंब्रह्मेतिजप्त्वासशिरः प्रणवव्याह्रत्यागायत्र्यातद् भस्मास्थीनितीर्थेक्षिप्त्वास्नानाच्छुचिः नास्यान्यदौर्ध्वदेहिकम् त्रिदंडग्रहणादेवप्रेतत्वंनैवजायतइतिउशनः स्मृतेः एकादशेह्निपार्वणंतदपित्रिदंडिनः हंसपरमहंसादीनांपार्वणादिकमपिनकार्यमितिशूलपाणिः श्राद्धचिंतामणौदत्तात्रेयः एकोद्दिष्टंजलंपिंडमाशौचंप्रेतसत् क्रियाम् नकुर्याद्वार्षिकादन्यद्ब्रह्मीभूतायभिक्षवे प्रेतक्रिययैकोद्दिष्टनिषेधेसिद्धेपुनस्तद्ग्रहणमाब्दिकपरं तेनतत्पार्वणमेव त्रिदंडिनांद्वादशेनारायणबलिः तद्विधिरन्यश्चविशेषः प्रागुक्तइत्यलंबहुना ।

कुटीचक संन्याशाचा तर दाह करावा , तो असा - वर सांगितल्याप्रमाणें प्रेत नेऊन खळगा खणून अग्नि प्रज्वलित करुन साग्निक संन्याशाच्या दक्षिण हस्तांत ‘ उपावरोह० ’ या मंत्रानें अवरोहण करुन किंवा निर्मंथन करुन गर्ताचे ठिकाणीं चिति करुन ‘ अग्निनाग्निः समिध्यते० ’ या मंत्रानें अग्नि देऊन गायत्रीमंत्रानें किंवा प्रणवमंत्रानें दहन करावें . नंतर प्रणवाचा व ‘ नारायणः परंब्रह्म ’ याचा अष्टशत जप करुन प्रणव , व्याह्रति , गायत्री , गायत्रीशिर या मंत्रांनीं ती राख आणि अस्थि तीर्थांत टाकून स्नान करुन कर्ता शुद्ध होतो . संन्याशाची दुसरी और्ध्वदेहिकक्रिया नाहीं . कारण , " संन्याशानें त्रिदंड ग्रहण केल्यामुळेंच त्याला प्रेतत्व प्राप्त होत नाहीं . " असें उशनसाचें स्मृतिवचन आहे . अकराव्या दिवशीं पार्वण श्राद्ध आहे , तें देखील त्रिदंडी संन्याशाचें आहे . हंस , परमहंस इत्यादिकाचें पार्वणादिक कोणतेंही कर्म करुं नये , असें शूलपाणि सांगतो . श्राद्धचिंतामणींत दत्तात्रेय - " ब्रह्मीभूत जो संन्याशी त्याचें एकोद्दिष्ट , उदकदान , पिंड , आशौच , प्रेतसत्क्रिया , इत्यादि कोणतेंही कर्म करुं नये . वार्षिकश्राद्ध मात्र करावें . " या वचनांत प्रेतक्रियेच्या निषेधानें एकोद्दिष्टाचा निषेध सिद्ध झाला असतां पुनः एकोद्दिष्टाचा वेगळा निषेध केला तो अशाकरितां कीं , वार्षिक श्राद्ध एकोद्दिष्ट करुं नये , असें सुचविण्याकरितां आहे . यावरुन तें वार्षिक श्राद्ध पार्वणच करावें . त्रिदंडी संन्याशांचा बाराव्या दिवशीं नारायणबलि करावा . त्या नारायणबलीचा विधि आणि दुसरा विशेष प्रकार पूर्वीं सांगितला आहे , आतां बहुत सांगणें पुरे करितों .

एवंनिरुपितमिदंगहनंतुधर्मतत्त्वंविचार्यवचनैश्चनयैश्चसम्यक् तद्दोषदृष्टिमपहायविवेचनीयंविद्वद्भिरित्यविरतंप्रणतोस्मितेषु १ मयासद्वासद्वायदिहगदितंमंदमतिनाकिमेतच्छक्यंवाध्यवसितुमपिस्वल्पमतिना तदेवंयत्किंचिद्गदितमिहविख्यातमहिमाप्रतापोयंसर्वोविकसतितुपित्रोश्चरणयोः २ योभाट्टतंत्रगणनार्णवकर्णधारः शास्त्रांतरेषुनिखिलेष्वपिमर्मभेत्ता योत्रश्रमः किलकृतः कमलाकरेणप्रीतोमुनास्तुसुकृतीबुधरामकृष्णः ३ श्रीभट्टरामेश्वरसूरिसूनुश्रीभट्टनारायणसूरिसूनोः श्रीरामकृष्णस्यसुतः कृतीमंव्यधान्निबंधंकमलाकराख्यः ४ नानानिर्णयवत्त्वान्निर्ण्यसिंधुः प्रोच्यतांविबुधाः निर्णयसरोजवत्त्वान्निर्णयकमलाकरोप्यस्तु ५ वसुऋतुऋतुभूमितेगतेब्देनरपतिविक्रमतोथयातिरौद्रे तपसिशिवतिथौसमापितोयंरघुपतिपादसरोरुहेर्पितश्च ६ जगति सकलविद्यासिंधुमुष्टिंधयानांपरभणितिपरीक्षायुज्यतेसज्जनानां तदिहममनिबंधेदूषणंभूषणंवायदिभवतिविदग्धैस्तद्धयवश्यंविमृश्यम् ७ इतिश्रीमत्पदवाक्यप्रमाणपारावारपारीणश्रीमद्रामेश्वरभट्टसूरिसूनुनारायणभट्टसुतविद्वन्मुकुटहीरांकुरश्रीरामकृष्णभट्टात्मजदिनकरभट्टानुजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौतृतीयपरिच्छेदः समाप्तः ॥

" हें फार गहन धर्माचें तत्त्व ऋषींच्या वचनांनीं आणि मीमांसेच्या न्यायांनीं चांगला विचार करुन याप्रमाणें निरुपण केलें आहे . विद्वानांनीं दोषदृष्टी सोडून त्याचें चांगलें विवेचन करावें , म्हणून त्या विद्वानांच्या ठिकाणीं मी सतत नम्र आहें . १ मंदमति असा जो मी ( कमलाकरभट्ट ) यानें या ग्रंथामध्यें जें कांहीं चांगलें किंवा वाईट सांगितलें तें स्वल्पमति अशा माझ्या मनांत आणण्यास तरी शक्य आहे काय ? तर जें कांहीं यत्किंचित् ‍ सांगितलें हा सारा मातापित्यांच्या चरणकमलांचा विख्यातमहिमाप्रताप विकसित होत आहे . २ कमलाकरानें जो या ग्रंथाचे ठिकाणीं श्रम केला आहे त्या श्रमानें , जो मीमांसासागरामध्यें पोहणारा इतकेंच नव्हे , तर दुसर्‍यास तरविणारा , आणि इतर सार्‍या शास्त्राचींही मर्मै भेदन करणारा अर्थात् तत्त्वजाणणारा असा धन्य पंडित रामकृष्णभट्ट संतुष्ट असो . ३ पंडित रामेश्वरभट्टाचा पुत्र पंडित नारायणभट्ट , त्याचा पुत्र रामकृष्णभट्ट , त्या रामकृष्णभट्टाचा पुत्र जो विद्वान् कमलाकरभट्ट त्यानें हा निबंध रचिला आहे . ४ हे पंडित हो ! नानाप्रकारच्या शास्त्रार्थांचे निर्णय या निबंधांत आहेत म्हणून या निबंधास निर्णयसिंधु असें म्हणा . आणि शास्त्रार्थांचे निर्णय हींच कमलें यांत असल्यामुळें निर्णयकमलाकर हेंही नांव याला असो . ५ कमलाकरभट्ट म्हणतो विक्रमशकाचीं १६६८ वर्षै गेल्यावर रौद्र संवत्सराच्या माघ चतुर्दशीस हा निबंध ( निर्णयसिंधु ) समाप्त केला आणि तो श्रीरामचंद्राच्या चरणकमलाचेठायीं अर्पणही केला . ६ ह्या जगामध्यें सकल विद्यासागराला अंजलीनें प्राशन करणार्‍या अशा सज्जनांना दुसर्‍याच्या उक्तींची परीक्षा करणें योग्य आहे , म्हणून ह्या माझ्या ग्रंथामध्यें जें कांहीं दूषण किंवा भूषण असेल त्याचा विद्वानांनीं अवश्य विचार करावा . ७ इतिश्री नवरे इत्युपाभिधेन बाबाजीभट्टात्मजेन कृष्णशर्मणा विरचिता निर्णयसिंधौ भाषाटीका समाप्ता .

॥ निर्णयसिंधु समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP