मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
आशौचाविषयीं रात्रीचा निर्णय

तृतीय परिच्छेद - आशौचाविषयीं रात्रीचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां आशौचाविषयीं रात्रीचा निर्णय सांगतो -
अथरात्रौजननेमरणेवारात्रिंत्रिभागांकृत्वाद्यभागद्वयेचेत्पूर्वंदिनं अंत्येतूत्तरमितिमिताक्षरायां यत्तुप्रागर्धरात्रात्प्राग्वासूर्योदयात्पूर्वैदिनमित्युक्तं तत्रदेशाचारतोव्यवस्था सर्वंचाशौचमाहिताग्रेर्दाहंतद्भिन्नस्यमरणमारभ्यज्ञेयम्‍ अनग्निमतउत्क्रांतेराशौचादिद्विजातिषु दाहादग्निमतोविद्याद्विदेशस्थेमृतेसतीति पैठीनसिस्मृतेः साग्निराहिताग्निः आहिताग्निश्चेत्प्रवसन्म्रियेतपुनः संस्कारंकृत्वाशववदाशौचमितिवसिष्ठेविशेषोक्तेः दाहादेवतुकर्तव्यंयस्यवैतानिकोविधिरितिब्राह्माच्च यत्तु धूर्तस्वामिनारामांडारेणचोक्तं आहिताग्नेरपिमरणाद्येवदशरात्रं दशाहंशावमाशौचमितिमरणनिमित्तत्वात्तस्य यत्तु दाहादेवतस्याशौचमुक्तम् तत्संस्कारनिमित्ताशौचंपृथगेव तेनगृह्याग्नेः संस्कारांगंत्रिरात्रं श्रौताग्नेस्तुदशरात्रं मरणनिमित्तंतूभयोर्दशाहं दाहात्‍ प्रागपीति तदेतद्वचनविरोधात्पूर्वस्यैवोत्कर्षान्मूलकल्पनालाघवाच्चचिंत्यम् ।

रात्रीं जनन किंवा मरण असतां रात्रीचे तीन भाग करुन पहिल्या दोन भागांत जनन व मरण असेल तर पहिला दिवस समजावा. तिसर्‍या भागांत जनन किंवा मरण असेल तर उत्तर दिवस धरावा, असें मिताक्षरेंत सांगितलें आहे. आतां जें अर्धरात्रीच्या पूर्वी असेल तर किंवा सूर्योदयाच्या पूर्वीं असेल तर पहिला दिवस, असें सांगितलें आहे, त्याविषयीं देशाचारावरुन व्यवस्था जाणावी. सारें आशौच आहिताग्नि ( अग्नीचें आधान केलेला ) मृत असेल तर त्याच्या दाहापासून समजावें. आधानरहित मृत असेल तर त्याच्या मरणापासून समजावें. कारण, “ ब्राह्मणादिकांमध्यें अग्निरहित असा परदेशांत मृत असतां त्याच्या प्राणोत्क्रमणापासून आशौच वगैरे समजावें. आणि श्रौताग्निमान्‍ मृत असतां त्याचा दाह झालेल्या दिवसापासून आशौच वगैरे समजावें ” असें पैठीनसिस्मृतिवचन आहे. या वचनांत अग्निमान्‍ म्हणजे आहिताग्नि समजावा. कारण, “ आहिताग्नि जर प्रवासांत मृत होईल तर पुनः संस्कार करुन शवाप्रमाणें आशौच धरावें ” असें वसिष्ठस्मृतींत आहिताग्नि, असें विशेष सांगितलें आहे. आणि “ ज्याचे श्रौताग्नि आहेत त्याचें आशौच दाह झालेल्या दिवसापासूनच करावें ” असें ब्राह्मवचनही आहे. आतां जें धूर्तस्वामीनें व रामांडारानें सांगितलें कीं, आहिताग्नीला देखील मरणदिवसापासूनच दहा दिवस. कारण, “ शवनिमित्तक आशौच दहा दिवस ” या मनु इत्यादि वचनांवरुन मरणनिमित्तक तें आशौच असल्यामुळें मरणदिवसापासूनच धरावें. आतां जें दाह केलेल्या दिवसापासूनच आशौच सांगितलेलें तें संस्काराचें अंगभूत आशौच निराळेंच आहे. तेणेंकरुन गृह्याग्नियुक्ताला संस्कारांग आशौच तीन दिवस. आणि श्रौताग्निमंताला संस्कारांग आशौच दहा दिवस. मरणनिमित्तक आशौच दोघांनाही दहा दिवस. तें दाहाच्या पूर्वीं देखील आहे, असें सांगितलें, तें त्यांचें ( धूर्तस्वामी व रामांडार यांचें ) मत, ह्या वरील वचनाशीं विरोध येत असल्याकारणानें; पूर्वींचेंच आशौच पुढें दाहानंतर धरणें होत असल्यामुळें; आणि असें मानून व्यवस्था होत असतां स्वतंत्र निराळें आशौच मानण्याविषयीं मूलवचनाची कल्पना करावयास नको, हें लाघव येत असल्यामुळें, ( त्यांचें मत ) चिंत्य ( अग्राह्य ) आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP