आतां आशौचाचा अपवाद सांगतो -
अथाशौचापवादः सचपंचधा कर्तृतः कर्मतः द्रव्यतः मृतदोषतः विधानाच्च आद्योब्रह्मचारियत्यादिषु नैष्ठिकानांवनस्थानांयतीनांब्रह्मचारिणां नाशौचंकीर्तितंसद्भिः पतितेचतथामृतइतिकौर्मोक्तेः तुर्यपादेशावेवापितथैवचेतिदेवलपाठः आशौचमंत्यकर्मोपलक्षणं ब्रह्मचारीनकुर्वीतशववाहादिकाः क्रियाः यदि कुर्याच्चरेत्कृच्छ्रंपुनः संस्कारमेवचेतिदेवलोक्तेः एतत् पित्राद्यतिरिक्तविषयं आचार्यंस्वमुपाध्यायंमातरंपितरंगुरुं निर्ह्रत्यतुव्रतीप्रेतंनव्रतेनवियुज्यतइतिमनूक्तेः हारीतः मातापित्रोस्तुयत्प्रोक्तंव्रतचारीतुपुत्रकः व्रतस्थोपिहिकुर्वीतपिंडदानोदकक्रियाम् भवत्यशौचंनैवास्यनैवाग्निस्तस्यलुप्यते स्वाध्यायंचप्रकुर्वीतपूर्ववद्विधिदर्शितं संवर्तः अन्यगोत्रोपसंबंधः प्रेतस्याग्निंददातियः पिंडंचोदकदानंचसदशाहंसमाचरेत् निर्हरणमंत्यकर्मपरं एवंमातामहस्य यथाव्रतस्थोपिसुतः पितुः कुर्यात् क्रियांनृप तथामातामहस्यापिदौहित्रः कर्तुमर्हतीत्यपरार्केभविष्योक्तेः मातापित्रोरुपाध्यायाचार्ययोरौर्ध्वदेहिकं कुर्वन्मातामहस्यापिव्रतीनभ्रश्यतेव्रतादितिकालादर्शाच्च तत्रांत्यकर्मनिमित्तमस्पृश्यत्वंदशाहमस्त्येव सगोत्रोवासगोत्रोवायोग्निंदद्यात्सखेनरः सोपिकुर्यान्नवश्राद्धंशुध्येत्तुदशमेहनीतिदिवोदासोक्तवचनात् अतएव ब्रह्मचारिणः शवकर्मिणोव्रतान्न्निवृत्तिरन्यत्रमातापित्रोर्गुरोश्चेतिगौतमीयेव्रतनिवृत्तेरेवपर्युदासोनाशौचस्य संध्यादिकर्मलोपस्तुनास्ति नत्यजेत्सूतकेकर्मब्रह्मचारीस्वकंक्वचिदितिछंदोगपरिशिष्टात् पित्रोर्गुरोर्विपत्तौतुब्रह्मचार्यपियः सुतः सव्रतश्चापिकुर्वीतअग्निपिंडोदकक्रियां तेनाशौचंनकर्तव्यंसंध्याचैवनलुप्यते अग्निकार्यंचकर्तव्यंसायंप्रातश्चनित्यशइति चंद्रिकायांसंवर्तोक्तेश्च अत्रकर्मानधिकाररुपाशौचनिषेधएव अपरार्कमाधवादयस्तुएकाहमाशौचमाहुः आचार्यंवाप्युपाध्यायंगुरुंवापितरंचवा मातरंवास्वयंदग्ध्वाव्रतस्थस्तत्रभोजनं कृत्वापततिनोतस्मात्प्रेतान्नंतत्रभक्षयेत् अन्यत्रभोजनंकुर्यान्नचतैः सहसंवसेत् एकाहमशुचिर्भूत्वाद्वितीयेहनिशुध्यतीतिब्राह्मोक्तेः तदन्नभोजनेतुप्रायश्चित्तंपुनरुपनयनमाशौचंच ।
त्या आशौचापवादाचे प्रकार पांच , ते असे - १ कितीएक कर्त्यांना आशौच नाहीं . २ कितीएक कर्माविषयीं आशौच नाहीं . ३ कितीएक द्रव्यांविषयीं ( पदार्थांविषयीं ) आशौच नाहीं . ४ कितीएक मृतदोषांनीं आशौच नाहीं . ५ कितीएक विधानांनीं आशौच नाहीं . या पांचांमध्यें पहिला प्रकार ब्रह्मचारी , यती इत्यादिकांविषयीं आहे . कारण , " नैष्ठिक ( नियम धारण करुन जपादि कर्मै करणारे ), वानप्रस्थ , संन्यासी , ब्रह्मचारी , यांना विद्वानांनीं आशौच सांगितलें नाहीं . आणि पतित मृत असतां त्याचें आशौच नाहीं . " असें कौर्मवचन आहे . या वचनाच्या चवथ्या पादांत ‘ शावे वापि तथैवच ’ असा देवलाचा पाठ आहे . अर्थ - ‘ जननांत किंवा मृतकांत त्यांना आशौच नाहीं . ’ या वचनांत ‘ आशौच ’ हें अंत्यकर्माचें उपलक्षण ( बोधक ) आहे . कारण , " ब्रह्मचार्यानें शववाहणें इत्यादि क्रिया करुं नयेत . जर तो करील तर कृच्छ्रप्रायश्चित्त व पुनः संस्कार करावा . " असें देवलवचन आहे . ब्रह्मचार्यानें प्रेतकर्म करुं नये , हें पिता इत्यादिव्यतिरिक्तांविषयीं समजावें . कारण , " आचार्य , आपला उपाध्याय , माता , पिता , गुरु यांचें प्रेत ब्रह्मचार्यानें नेऊनही तो आपल्या व्रतापासून भ्रष्ट होत नाहीं " असें मनुवचन आहे . हारीत - " ब्रह्मचर्यव्रताचरण करणार्या पुत्रानें व्रतस्थ असूनही मातापितरांचें शास्त्रविहित जें पिंडदान - उदकदान इत्यादि कर्म तें करावें , त्याला आशौच नाहीं व त्याचा अग्निही लुप्त होत नाहीं . पूर्वींप्रमाणें विधीनें सांगितलेलें वेदाध्ययनही त्यानें करावें . " संवर्त - " जो अन्यगोत्री प्रेताला अग्नि देतो व पिंडदान , उदकदान करितो त्यानें दहा दिवस आशौच करावें . " वरील मनुवचनांत प्रेताचें निर्हरण ( नेणें ) सांगितलें तेणेंकरुन अंत्यकर्म समजावें . याप्रमाणें ब्रह्मचार्यानें मातामहाचें करावें . कारण , " पुत्र व्रतस्थ असूनही जशी पित्याची क्रिया करितो , तशी दौहित्र व्रतस्थ असूनही मातामहाची देखील क्रिया करण्याविषयीं योग्य आहे . " असें अपरार्कांत भविष्यवचन आहे . आणि " माता , पिता , उपाध्याय , आचार्य , आणि मातामह यांचें और्ध्वदेहिक ( अंत्यकर्म ) करणारा ब्रह्मचारी आपल्या व्रतापासून भ्रष्ट होत नाहीं . " असें कालादर्शाचें वचनही आहे . तें कर्म करीत असतां ब्रह्मचार्याला अंत्यकर्मनिमित्तक अस्पृश्यत्व दहा दिवस आहेच . कारण , " सगोत्र किंवा असगोत्र जो अग्नि देईल त्यानेंच नवश्राद्ध करावें , व तो दहाव्या दिवशीं शुद्ध होईल . " असें दिवोदासानें उक्त वचन आहे . ब्रह्मचार्याला दहा दिवस अस्पृश्यत्व आहे म्हणूनच " अंत्यकर्म करणार्या ब्रह्मचार्याची ब्रह्मचर्यव्रतापासून निवृत्ति होते . माता , पिता , व गुरु यांचें कर्म करणाराची व्रतापासून निवृत्ति होत नाहीं . " ह्या गौतमवचनांत व्रतनिवृत्तीचाच निषेध केला आहे . आशौचाचा निषेध केला नाहीं . संध्यादि नित्यकर्माचा लोप तर होत नाहीं . कारण , " सूतकामध्यें ब्रह्मचार्यानें आपलें कर्म कधींही टाकूं नये " असें छंदोगपरिशिष्टवचन आहे . आणि माता , पिता , गुरु हे मृत असतां जो पुत्र ब्रह्मचारी उत्तमव्रत धारण करणारा असेल त्यानेंही अग्निसंस्कार , पिंडदान , उदकदान इत्यादि क्रिया करावी . त्यानें आशौच करुं नये , व त्याच्या संध्येचा लोपही होत नाहीं . त्यानें दररोज सायंकालीं व प्रातः कालीं अग्निकार्य करावें " असें चंद्रिकेंत संवर्तवचनही आहे . येथें कर्माविषयीं अनधिकार उत्पन्न करणार्या आशौचाचाच निषेध केला आहे . अपरार्क - माधव इत्यादिक तर - एक दिवस आशौच सांगतात . कारण , " व्रतस्थ असून आचार्य , किंवा उपाध्याय , अथवा गुरु किंवा पिता , अथवा माता यांना स्वतः दग्ध करुन त्यांच्यांत भोजन करील तर तो पतित होईल , यास्तव त्या ठिकाणीं प्रेतान्न भक्षण करुं नये . दुसर्या ठिकाणीं भोजन करावें . त्यांच्या बरोबर वास करुं नये . त्यानें असें केल्यानें तो एक दिवस अशुचि होऊन दुसर्या दिवशीं शुद्ध होतो " असें ब्राह्मवचन आहे . त्या आशौचवंतांचें अन्न भक्षण करील तर प्रायश्चित्त , पुनः उपनयन , आणि आशौच हीं करावीं .
दिवोदासादयस्तु ब्राह्मोक्तेः प्रथमेऽह्निसंध्यादिलोपः ब्रह्मचारीयदाकुर्यात्पिंडनिर्वपणंपितुः तावत्कालमशौचंस्यात्पुनः स्नात्वाविशुध्यतीतिप्रजापतिवचनात् द्वितीयाहादौपिंडदानकालेएवास्पृश्यत्वमात्रं नान्यदेत्याहुः दशाहमस्पृश्यत्वेपिकर्मांगस्नानविधानार्थमेतदितियुक्तं अंत्यकर्माकरणेतु ब्रह्मचारिणः पित्रादिमरणेप्याशौचाभावएवसोपिब्रह्मचर्यकालएव समावर्तनोत्तरंतुपूर्वमृतानांत्र्यहाशौचंभवत्येव आदिष्टीनोदकंकुर्यादाव्रतस्यसमापनात् समाप्तेतूदकंदत्वात्रिरात्रमशुचिर्भवेदितिमनूक्तेः तत्रापिविकल्पः पितर्यपिमृतेनैषांदोषोभवतिकर्हिचित् आशौचंकर्मणोंतेस्यात्र्यहंवाब्रह्मचारिणामिति छंदोगपरिशिष्टात् तथाकृतजीवच्छ्राद्धेनकिमप्याशौचंनकार्यमितिहेमाद्रिः शुद्धितत्त्वेकौर्मे सद्यः शौचंसमाख्यातंदुर्भिक्षेचाप्युपद्रवे डिंबाहवहतानांचविद्युतापार्थिवैर्द्विजैः उपद्रवेत्यंतमरके उपसर्गमृतेचैवसद्यः शौचंविधीयतइतिपराशरोक्तेः उपसर्गोत्यंतमरकइतिशूलपाण्यनिरुद्धभट्टादयः याज्ञवल्क्योपि आपद्यपिचकष्टायांसद्यः शौचं विधीयतइति मरणसमयेपिनाशौचं तथाचशुद्धिरत्नाकरेदक्षः स्वस्थकालेत्विदंसर्वंसूतकंपरिकीर्तितम् आपद्धतस्यसर्वस्यसूतकेपिनसूतकं अतः सतिवैराग्येसंन्यासोप्यातुरस्यभवतीतिकेचित् ।
दिवोदास इत्यादिक तर - वर सांगितलेल्या ब्राह्मवचनावरुन पहिल्या दिवशीं संध्यादि कर्मांचा लोप होतो . कारण , " ज्या वेळीं ब्रह्मचारी पित्याला पिंडप्रदान करील तावत्कालपर्यंत त्याला आशौच आहे . पुनः स्नान करुन तो शुद्ध होतो " ह्या प्रजापतिवचनावरुन दुसर्या दिवशीं वगैरे पिंडदानकालींच अस्पृश्यत्वरुपच आशौच , अन्यकालीं आशौच नाहीं , असें सांगतात . दहा दिवस अस्पृश्यत्व असतांही कर्मांगस्नान सांगण्याकरितां हें वचन आहे , असें म्हणणें युक्त आहे . अंत्यकर्म करणारा नसेल तर ब्रह्मचार्याला पिता इत्यादि मृत असतांही आशौच नाहींच व तें ब्रह्मचर्यकालींच नाहीं . समावर्तन ( सोडमुंज ) केल्यानंतर पूर्वीं मेलेल्यांचें तीन दिवस आशौच येतच आहे . कारण , " ब्रह्मचार्यानें आपलें व्रत समाप्त होईतोंपर्यंत मृत झालेल्यांना उदक देऊं नये . व्रत समाप्त झाल्यावर उदक देऊन तीन दिवस आशौच धरावें . " असें मनुवचन आहे . समावर्तनोत्तरही आशौचाचा विकल्प आहे . कारण , " पिता देखील मृत असतां ब्रह्मचार्यांना कधींही दोष ( आशौच ) नाहीं . अथवा ब्रह्मचार्यांना कर्माच्या अंतीं तीन दिवस आशौच आहे " असें छंदोगपरिशिष्टवचन आहे . तसेंच ज्यानें जीवच्छ्राद्ध ( पिता जीवंत असतां त्याचें श्राद्ध करणें तें ) केलें असेल त्यानें देखील आशौच धरुं नये . असें हेमाद्रि सांगतो . शुद्धितत्त्वांत कौर्मांत - " दुष्काळांत मेलेल्यांचें ; उपद्रवांत ( महामारी , प्लेग इत्यादिकांनीं अतिशय मरकांत ) मृतांचें ; युद्धांत मृतांचें ; विजेनें , राजांनीं व ब्राह्मणांनीं मारलेल्यांचें सद्यः शौच ( तत्कालशुद्धि ) सांगितलें आहे . " या वचनांत ‘ उपद्रव ’ म्हणजे अत्यंत मरक समजावें . कारण , " उपसर्गांत मृत असतां सद्यः शौच सांगितलें आहे " असें पराशरवचन आहे . उपसर्ग म्हणजे अत्यंत मरक , असें शूलपाणि , अनिरुद्धभट्ट इत्यादिक सांगतात . याज्ञवल्क्यही - " अतिशय कष्ट देणारी आपत्ति प्राप्त असतांही सद्यः शौच सांगितलें आहे . " मरणसमयीं देखील आशौच नाहीं , तेंच सांगतो शुद्धिरत्नाकरांत दक्ष - " हें सारें सूतक ( आशौच ) स्वस्थकालीं सांगितलें आहे . आपत्तीनें ग्रस्त झालेल्या सर्व मनुष्यांला सूतकांतही सूतक नाहीं . " या वचनावरुन वैराग्य उत्पन्न झालेलें असतां सूतकांत आतुराला संन्यासही होतो , असें केचित् म्हणतात .