गर्भिणीच्या मरणाविषयीं सांगतो -
गर्भिणीमृतौमदनरत्नेशौनकः गर्भिण्युदक्यासंस्कारंशिशुसंस्कारमेवच प्रवक्ष्यामिसमासेनशौनकोहं द्विजन्मनां गर्भिणीमरणेप्राप्तेगोमूत्रेणजलैः सह आपोहिष्ठादिभिर्मंत्रैः प्रोक्ष्यभर्तासमास्थितः प्रेतंश्मशानेनीत्वाथोलिख्यसव्योदरंततः पुत्रमादायजीवंश्चेत्स्तनंदत्वासुतायतु यस्तेस्तनः शशयइत्यृचाग्रामेनिधायच उदरंचाव्रणंकुर्यात्पृषदाज्येनपूर्यच मृद्भस्मकुशगोमूत्रैरापोहिष्ठादिभिस्त्रिभिः स्नाप्यचाच्छाद्यवासोभिः शवधर्मेणदाहयेत् तत्रैवषडशीतिमतेगद्यानि गर्भिण्यांमृतायांदक्षिणाशिरसंनिधायतस्यानाभिरंध्रात्सव्यमुदरंचतुरंगुलंहिरण्यगर्भः समवर्ततेतिछित्त्वागर्भश्चेदप्राणस्तंप्रक्षाल्यनिखनेत्सयदिजीवन् जीवत्वंममपुत्रकेत्युक्त्वाक्षेत्रियेत्वेतिपंचभिः स्नापयित्वा हिरण्यमंतर्धायभूमौनिधायव्याह्रतिभिरभिमंत्र्ययस्तेस्तनः शशयइतिस्तनंपाययित्वाशिशुं ग्रामंप्रापयेत् गर्भछेदस्थलेशतायुधायेतिपंचाहुतीर्हुत्वाप्राणायस्वाहापूष्णेस्वाहेत्यनुवाकाभ्यांव्याह्रत्यावाज्यंहुत्वाभिन्नमुदरंसूत्रेणसंग्रथ्यघृतेनानुलिप्यब्राह्मणायतिलान्गांभूमिंसुवर्णंदद्यादथयथोक्तेनकल्पेनदहेत् बौधायनेनतुशतायुधायेतिपंचहोमानंतरंप्रयासाययासायवियासायसंयासायोद्यासायशुचेशोकायतप्यतेतपत्यैब्रह्महत्यायैसर्वस्मैइतिस्वाहांतैराहुतयोप्यधिकाउक्ताः गृह्यकारिकायां यदागर्भवतीनारीसशल्यासंस्थिताभवेत् कुक्षिंभित्त्वाततः शल्यंनिर्हरेद्यदिजीवति प्रमीतंनिखनेत्तंतुप्रायश्चित्तमतः परं सात्रयस्त्रिंशताकृच्छ्रैः शुध्यतेशल्यदोषतः सगर्भदहनेतस्यावर्णजंवधपातकं प्रायश्चित्तंचरित्वातुशुध्यंतिपापकारिणः दग्ध्वातुगर्भसंयुक्तांत्रिरब्दंकृच्छ्रमाचरेत् ।
मदनरत्नांत शौनक - “ मी शौनक ब्राह्मणांच्या गर्भिणीचा व रजस्वलेचा संस्कार, आणि शिशुसंस्कार संक्षेपानें सांगतों. गर्भिणी स्त्री मृत असतां गोमूत्र व उदक यांनीं ‘ आपोहिष्ठा० ’ इत्यादि मंत्रांनीं प्रोक्षण करुन प्रेत श्मशानांत नेऊन भर्त्यानें शस्त्र घेऊन तिचें डावीकडचें उदर फाडून गर्भाशयांतून गर्भ काढून घेऊन तो गर्भ जीवंत असेल तर, ‘ यस्तेस्तनः शशय० ’ ह्या ऋचेनें पुत्राचे मुखांत स्तन देऊन पुत्राला गांवांत नेऊन ठेवावा. फाडलेले उदरांतील आंतडीं जागच्याजागीं बसवून त्यांत दधियुक्त घृत घालून तें उदर व्रणरहित करावें, नंतर मृत्तिका, भस्म, कुशोदक, गोमूत्र यांनीं व ‘ आपोहिष्ठा ’ या तीन ऋचांनीं शुद्धोदकानें स्नान घालून वस्त्रांनीं आच्छादित करुन प्रेतधर्मानें दाह करावा. ” तेथेंच षडशीतिमतांतील गद्यें - ( फक्किकारुप वचनें ) - “ गर्भिणी मृत असतां तिला दक्षिणदिशेस मस्तक करुन ठेवून तिच्या नाभीच्या वाम बाजूचें उदर ‘ हिरण्यगर्भः समवर्तता. ’ या मंत्रानें चार अंगुलें फाडून त्यांतून गर्भ काढून तो जर मृत असेल तर त्याला धुवून पुरावें. तो जर जीवंत असेल तर ‘ जीवतां मम पुत्रक ’ असें म्हणून ‘ क्षेत्रियेत्वा ’ ह्या पांच मंत्रांनीं स्नान घालून सुवर्ण अंतरित करुन भूमीवर ठेवावा आणि व्याह्रतींनीं अभिमंत्रण करुन ‘ यस्तेस्तनः शशय० ’ ह्या मंत्रानें स्तन पाजवून नंतर शिशु गांवांत पोंचवावा. गर्भस्थानाच्या छेदाचे ठिकाणीं ‘ शतायुधाय० ’ ह्या मंत्रांनीं पांच आहुति होम करुन ‘ प्राणायस्वाहा, पूष्णेस्वाहा ’ ह्या दोन अनुवाकांनीं किंवा व्याह्रतिमंत्रांनीं आज्यहोम करुन फाडलेलें उदर सूत्रानें चांगलें बांधून घृताचा लेप देऊन ब्राह्मणांना तिल, गाई, भूमि, सुवर्ण द्यावें. नंतर यथोक्तविधीनें त्या प्रेताचा दाह करावा. ” बौधायनानें तर - वर सांगितलेले ‘ शतायुधाय० ’ हे पांच होम केल्यानंतर ‘ प्रयासाय, यासाय, वियासाय, संयासाय, उद्यासाय, शुचे, शोकाय, तप्यते, तपत्यै, ब्रह्महत्यायै, सर्वस्मै ’ ह्या स्वाहाकारांत मंत्रांनीं अधिक आहुति सांगितल्या आहेत. गृह्यकारिकेंत - “ ज्या वेळीं गर्भिणी स्त्री गर्भ आंत राहून मृत होईल त्या वेळीं तिची कुक्षि फाडून उदरांतून गर्भ बाहेर काढावा. जर जिवंत असेल ( तर विधिपूर्वक स्वीकार करावा. ) मृत असेल तर तो भूमींत पुरुन टाकावा, नंतर प्रायश्चित्त करावें. तेहतीस कृच्छ्र प्रायश्चित्तानें ती स्त्री शल्यदोषापासून शुद्ध होते. गर्भसहित स्त्रियेचें दहन केलें असतां ज्या जातीचा गर्भ असेल त्या जातीच्या वधाचें पातक प्राप्त होतें. दहन करणारे पापकारी प्रायश्चित्त करुन शुद्ध होतात. गर्भयुक्त स्त्रियेचा दाह केला असतां तीन अब्दकृच्छ्र प्रायश्चित्त करावें. ”